BJP MP Unmesh Patil News : जळगावचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी चार वर्षांत ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली. त्यामुळे देशतील सक्रिय सदस्यांच्या 'टॉप- १०’ यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. (MP Unmesh Patil has been included in the top ten list of country)
लोकसभा सचिवालयाने (Centre Government) जारी केलेल्या माहितीनुसार विद्यमान आणि लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. त्या खासदारांच जळगावचे (Jalgaon) भाजपचे (BJP)उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांचा समावेष आहे.
अशा लोकसभेत तब्बल २७० खासदारांमध्ये उन्मेश पाटील यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवत दहावा क्रमांक पटकावला आहे. या लोकसभेत एकूण २७० खासदार आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या संसद सदस्यांनी गेल्या चार वर्षांत नेमकी काय कामगिरी बजावली याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेसमधून समोर आली आहे.
सध्याच्या लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या २७० सदस्यांपैकी मंत्रिपद मिळालेल्या तसेच अल्प सहभाग घेतलेल्या सदस्यांना वगळून २५० सदस्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता मनोरंजक माहिती समोर आली आहे. यात सदस्यांनी गेल्या चार वर्षात तब्बल ४१ हजार १०४ प्रश्न विचारले असून ६८५ खासगी विधेयके सादर केली आहेत. यासोबत या सदस्यांनी अंडर हाऊस रूल ३७७ च्या अंतर्गत १९०८ महत्वाचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले आहेत.
या तिन्ही म्हणजेच प्रश्न विधेयके आणि चर्चामधील सहभाग निकषांच्या बाबतीत काही खासदार हे आघाडीवर दिसून आले आहेत. या यादीमध्ये खासदार उन्मेश पाटील यांचा टॉप टेन खासदारांमध्ये समावेश झाला आहे. पीआरएस इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली आहे. यात आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पहिल्या दहापैकी निम्मे म्हणजे पाच सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत.
जळगावचे युवा खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची छाप आधीच उमटवली असताना सर्वाधिक सक्रिय असणाया टॉप १० सदस्यांमध्ये त्यांचा झालेला समावेश हा लक्षणीय मानला जात आहे. त्यांनी गेल्या चार वर्षांत ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. यात वर नमूद केल्यानुसार तिन्ही बाबींचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.