Sanjay Raut Politics: संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर, थेट प्रचारालाच दिला नकार!

Unmesh Patil; Rajeev Deshmukh, NCP supporters' refusal to campaign for Shivsena-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार संघ हिसकावले, त्याचे पडसाद उमटत आहेत.
Sanjay Raut, Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Sanjay Raut, Unmesh Patil & Rajeev DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Shivsena NCP News: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पक्षाने जागा वाटपाच्या चर्चेत सर्वाधिकार दिले होते. खासदार राऊत यांनी अतिशय आक्रमक होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नमवले. त्याचे पडसाद आता मतदारसंघात उमटू लागले आहेत.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव मतदार संघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. अनेक वर्ष येथे काँग्रेस पक्षाचेच आमदार होते. गेली काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक आणि पदाधिकारी निवडणुकीची तयारी करीत होते.

मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आला. त्याचे राजकीय पडसाद चाळीसगाव शहरात उमटले. आता शिवसेना ठाकरे पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्याची परतफेड म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाने माजी खासदार उन्मेष पाटील यांना चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

Sanjay Raut, Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Sujay Vikhe : 'मला मारण्याचा पूर्वनियोजित कट'; संगमनेरमधील हिंसाचारावर माजी खासदार विखेंचा गंभीर आरोप

खासदार राऊत यांनी आक्रमक होत आणि प्रसंगी युती तोडण्याचा इशारा देत अनेक जागांवर अधिकार सांगितला. यामध्ये चाळीसगाव मतदारसंघ देखील आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार होता. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारी देखील केली होती.

जागा वाटपात शेवटच्या टप्प्यात अनपेक्षितपणे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आला. आक्रमकतेमुळे खासदार राऊत यांनी मतदारसंघ मिळविला. मात्र त्याचा उपद्रव शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि उमेदवाराला होत आहे.

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत चाळीसगाव मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Sanjay Raut, Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Congress Candidate List : काँग्रेसच्या 'या' विद्यमान आमदाराचा पत्ता कट, युवा चेहऱ्याला संधी

शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवार माजी खासदार पाटील यांचा प्रचार करायचा नाही, असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शशिकांत साळुंखे, सतीश दराडे, किसनराव जोर्वेकर यांचा विविध पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असहकाराचा नारा दिला आहे. त्यांचे हे बंड शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला चांगलेच जड जाण्याची चिन्हे आहेत.

या निमित्ताने महाविकास आघाडीतील समन्वय देखील कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होतो की काय अशी स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाने येथून विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. आमदार चव्हाण यांनी आक्रमकपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत भाजपमधून शिवसेनेत आलेल्या माजी खासदार पाटील यांना मंगेश चव्हाण यांना आव्हान देणे अवघड होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते खासदार राऊत यांनी आक्रमक धोरण स्वीकारून जास्त जागा शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या. मात्र त्यामुळे निर्माण झालेली नाराजी हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर तोडगा काढणे जाहीर केलेल्या उमेदवारांना अवघड होत आहे. शिवसेनेचा आक्रमकपणा महाविकास आघाडीतील एकोप्याला बाधा आणू शकतो, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सहकारी पक्षांच्या नेत्यांची मने दुखावली आहेत. त्यांना एकत्र करणे हे एक आव्हान ठरण्याची शक्यता आहे. ते महायुतीच्या पथ्यावर पडते की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com