Shirdi Loksabha : खासदार लोखंडे म्हणजे ‘मिस्टर इंडिया’, उत्कर्षा रुपवतेंचा टोला

Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांची सभा सुरू असतानाच वंचितचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनवरून सभेशी संवाद साधला. वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक निकराने लढण्याचा आदेश दिला.
Utkarsha Rupwate nomination form filed
Utkarsha Rupwate nomination form filedsarkarnama

Nagar Political News ः वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. उत्कर्षा रूपवते यांनी यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे Bhausaheb Wakchaure यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मंत्री विखे यांचे नाव न घेता रुपवते म्हणाल्या, एक मोठी धनशक्ती विरोधात उभी आहे. यंत्रणा आहे. त्या देखील आपल्या विरोधात उभ्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील एक भूमिकन्या म्हणून लोक पाठीशी उभे आहेत", असा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.

Utkarsha Rupwate nomination form filed
Lok Sabha Election 2024 : भुजबळांच्या 'त्या' विधानाने गोडसे समर्थक अस्वस्थ?

उत्कर्षा रुपवते Utkarsha Rupwate यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा नाव न घेता टीकास्त्र सोडले. खासदार लोखंडे यांच्याविषयी बोलताना एक उमेदवार ‘मिस्टर इंडिया’ असून मतदारसंघात कधीच दिसत नाहीत, असा टोला लगावला. माजी खासदार वाकचौरे यांच्याविषयी एकदा ते प्रशासकीय सेवेतून रिटायर झाले असून आता त्यांना राजकारणातून कायमचे रिटायर करण्याची वेळ आली आहे. शिर्डीत मतदारसंघातील Shirdi Loksabha पाणी, युवा, शेतकरी, महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. आंतरराष्ट्रीय ठिकाणी वाकचौरे आणि लोखंडे फक्त एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत निवडणूक लढत आहेत आणि हे दुर्दैवी असल्याचे उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले.

वंचितच्या राज्य उपाध्यक्ष आणि प्रवक्त्या पिंकी दिशा शेख यांनी वाकचौरे आणि लोखंडे जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर मौन बाळगून असल्याची टीका केली. अरुण जाधव, अजीजभाई वोहरा, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्कर्षा रुपवते यांची सभा सुरू असतानाच वंचितचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनवरून सभेशी संवाद साधला. वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूक निकराने लढण्याचा आदेश दिला. वाहन किंवा कोणत्याही साधनांच्या अभावामुळे कार्यकर्त्यांनी अडून न राहता उत्कर्षा रुपवतेंना बहुमताने निवडून आणण्यासाठी मेहनत करावे, असे त्यांनी सांगितले.

नऊ उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज (बुधवारी) नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज सात व्यक्तींनी 14 नामनिर्देशनपत्र दाखल झाले. गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), ॲड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतीश भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी) व उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी) या नऊ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

(Edited By Roshan More)

Utkarsha Rupwate nomination form filed
Ajit Pawar: भाजपच्या ट्रॅपमध्ये अजित पवार फसले का? अजितदादा म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com