Ajit Pawar News : काहीजण येऊन वेगळं वातावरण तयार करीत आहेत; अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Pimpri Chinchwad Politics : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार राष्ट्रवादी उद्योगनगरीत जोमाने कामाला लागली आहे.
Ajit Pawar ,Rohit Pawar
Ajit Pawar ,Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२०) पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड या आपल्या आवडत्या शहराचा दौरा केला. या वेळी त्यांनी शहरात काहीजण येऊन वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल वरचेवर शहर दौऱ्यावर येणारे रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला. ते आल्यावर एरव्ही होणारी मोठी गर्दी या वेळी दिसली नाही. त्याची चर्चा नंतर रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादा येताच स्थानिक नेत्यांची नेहमीसारखी गर्दी झाली, पण कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांची, मात्र ती दिसून आली नाही. त्यांचा संध्याकाळी कार्यक्रम झालेले पिंपरी महापालिकेचे आठशे प्रेक्षक क्षमतेचे निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह भरले नाही. त्यांच्या पक्षाच्या वतीने या वर्षीच्या गणेशोत्सव आणि गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा हा सोहळा होता. दुपारी तीन वाजता त्यांचा हा दौरा सुरू झाला. पाच तासांत आपल्या कामाच्या झपाट्याने पाच कार्यक्रम घेतले. त्यात दोन ज्वेलर्सची दुकान, क्लिनिक आणि एका स्टोअरचे उद्घाटन त्यांनी केले.

Ajit Pawar ,Rohit Pawar
Manoj Jarange Patil Speech : जरांगेंची शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टोलेबाजी!

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार राष्ट्रवादी उद्योगनगरीत जोमाने कामाला लागली आहे. रोहित पवारांसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. त्या तुलनेत अजित पवार गटात शांतता होती व आहे. हा धागा पकडून अजितदादांनी पुतण्याचे नाव न घेता त्याला टार्गेट करीत वरील विधान केलं. तसेच शहरवासीयांना माहीत आहे, की स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर मीच शहरात लक्ष घातलं, विकासासाठी मी कटिबद्ध राहिलो, पुढेही राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार राष्ट्रवादीतील वाढती घरवापसी आणि इन्कमिंग लक्षात घेऊन आपल्या पक्षात नवीन कार्यकर्ते कसे येतील हे पाहा, त्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना देत एकप्रकारे त्यांचे कान टोचले.

मागच्या काळात शहराच्या विकासाची घडी बिघडली, असे म्हणत अजितदादांनी नाव न घेता महापालिकेत गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपलाही आपल्या निशाण्यावर घेतलं. ही घडी बसवून श्रीमंत पालिका हा नावलौकिक पुन्हा मिळवाय़चा आहे, असे ते म्हणाले. टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू असून, चुकीचा खर्च होत आहे, या शब्दांत पालिकेतील प्रशासकीय कारभारावर त्यांनी कोरडे ओढले. त्यामुळे पंधरवड्याने कामांचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द झाल्याने आता लवकरच सरकार दीड लाख सरकारी पदांची नियमित कायम भरती करणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, युवक शहराध्यक्ष शेखर काटे, प्रवक्ते विनायक रणसुंभे आदी या वेळी उपस्थित होते.

Ajit Pawar ,Rohit Pawar
Manoj Jarange Patil Speech : उद्यापासून कामाला लागा! आंदोलन पुन्हा पेटणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com