Dhule Loksabha 2024: वंचितच्या उमेदवारामुळे भाजप 'ठंडा-ठंडा, कुल- कुल'

Loksabha Election 2024 : 'वंचित'च्या मत विभागणीच्या डावपेचाने मुस्लिम मतांची होणार विभागणी. त्यामुळे या मतदारसंघातील गेल्या तीनही निवडणुका मत विभागणीमुळे चर्चेत राहिल्या आहेत.
Subhash Bhamre, Shobha Bacchav
Subhash Bhamre, Shobha Bacchav Sarkarnama
Published on
Updated on

Vanchit Aghaadi News : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचा उमेदवाराबाबत गोंधळ आहे. यामध्ये 'वंचित'ने (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार देऊन भाजपला दिलासा दिला आहे.

धुळे मतदारसंघात (Dhule Constituency) मालेगाव शहर आणि धुळे शहरातील अल्पसंख्याक मते निवडणुकीत निर्णायक असतात. दरवेळी भारतीय जनता पक्ष खेळी खेळून येथे अल्पसंख्याक समाजाच्या काही अपक्षांना बळ पुरवत असते. या उमेदवाराला मिळालेली मते म्हणजे काँग्रेसच्या मतदानातून झालेली वजावट असते. त्याचा थेट लाभ भाजपच्या उमेदवाराला होतो. त्यामुळे या मतदारसंघातील गेल्या तीनही निवडणुका मत विभागणीमुळे चर्चेत राहिल्या आहेत.

यंदा भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रयत्न करण्याआधीच 'एमआयएम' कामाला लागले होते. मात्र, उमेदवार देण्याबाबत त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. 'एमआयएम'चे (MIM) या मतदारसंघात दोन आमदार आहेत. मात्र, त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, फारसे स्थान नसतानाही वंचित बहुजन आघाडीने मात्र येथे निवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रहमान यांचा मालेगाव शहराशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते कितपत प्रभावी ठरतील, हे सांगता येत नाही. मात्र, त्यांना मिळणारी अल्पसंख्याक समाजाची मते काँग्रेसची (Congress) झोप उडवणार आहे. भारतीय जनता पक्षाला ती मदतच ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध प्रचार करीत त्यांच्याच उमेदवाराला फायदा होईल अशी ही रणनीती असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, त्याची फारशी तमा न बाळगता वंचित आघाडीने येथे उमेदवार देऊन आपला नेहमीचा कित्ता गिरवला आहे.

Subhash Bhamre, Shobha Bacchav
Ahmednagar Lok Sabha Constituency : 'का रे हा दुरावा...' नीलेश लंकेंबाबत रोहित पवारांच्या मनात काय?

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याबाबत पक्षातूनच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. पक्षाने केलेल्या 'सर्वे'मध्येदेखील नकारात्मक सूर होता, असे बोलले जाते. त्यामुळे भाजपकडे आठ ते नऊ जणांनी उमेदवारी मागितली होती. या भाऊ गर्दीत डॉ. भामरे यांना उमेदवारी मिळेल काय? याबाबत अनिश्चितता होती. मात्र, भामरे यांचे गुजरात कनेक्शन पुन्हा एकदा मदतीला आले. त्यांना उमेदवारी मिळाली. डॉ. भामरे यांनी आपला प्रचारदेखील सुरू केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा विजयासाठी निश्चित वाटू लागले आहे. त्यात मत विभागणी हा प्रमुख फॅक्टर त्यांच्या मदतीला धावून येईल असे दिसते.

धुळे मतदारसंघात नाशिकचे तीन आणि धुळ्याचे तीन असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यात मराठा-पाटील समाजाचे प्राबल्य आहे. मालेगाव शहरात तसेच धुळे शहरात सुमारे साडेचार लाख अल्पसंख्याक समाजाची मते आहेत. त्या खालोखाल दलित आणि आदिवासी मतदार आहेत. मतदारांची ही विभागणी लक्षात घेऊनच वंचित आघाडीने अल्पसंख्याक उमेदवार दिलेला आहे. वंचितच्या अब्दुल रहमान यांना अल्पसंख्याक दलित आणि आदिवासी मते मिळतील असा त्यांचा कयास आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याबाबत फारसे गांभीर्याने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. सध्या त्यांच्याकडे डॉ. तुषार शेवाळे (Tushar Shevale) आणि डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bacchav) या दोन नावांचे प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत यातील एकाला उमेदवारी मिळेल. मात्र, ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मते मागणार आणि मोदी यांचे विरोधक परस्परांवर टीका करत मोदीविरोधी मतांची विभागणी करणार, असे विचित्र समीकरण धुळे मतदारसंघात दिसून येत आहे.

Edited By: Rashmi Mane

R

Subhash Bhamre, Shobha Bacchav
Jalgaon Lok Sabha 2024: शिवसेनेची उमेदवारी मिळताच, करण पवारांनी भाजपचं केलं ऑपरेशन

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com