Vanchit Protest : 'वंचित'च्या आंदोलनाने पोलिसांची धावपळ! अचानक उतरले रस्त्यावर...

Nashik News : रस्ता आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते, याबाबत नाशिक महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही उपाययोजना झालेली नव्हती.
Vanchit Protest
Vanchit ProtestSarkarnama

Nashik : सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्ता क्रमांक 16 आणि 27 येथे बेकायदा पार्किंग होत असते. हा रस्ता आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते, याबाबत नाशिक महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही उपाययोजना झालेली नव्हती. त्यामुळे सातपूर औद्योगिक वसाहतीतील अरुंद रस्ते व बेकायदा पार्किंगविरोधात आज (बुधवारी) अचानक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला, त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

Vanchit Protest
high Court Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंना हजर राहण्याचे निर्देश

नाशिक (Nashik) महापालिकेच्या निगडित असलेल्या प्रश्नावर महापालिका आणि एमआयडीसी यांच्यातील विसंवादाचा फटका नागरिकांना बसतो. या भागात कामगारांची वर्दळ असते, तरीही अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने वारंवार अपघात होतात. स्थानिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर आज अचानक वंचित (vanchit) आघाडीने आंदोलन सुरू केले.

अचानक झालेले हे आंदोलन नियंत्रित करण्यासाठी पोलिस पथकाची चांगलीच धावपळ झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वंचित आघाडीचे शहराध्यक्ष बजरंग शिंदे आणि माजी नगरसेविका ज्योती सोनवणे यांच्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी वामन गायकवाड, माजी नगरसेवक संजय साबळे, नितीन मोहिते, जिल्हाध्यक्ष गोपाताई बजरंगे, अनिल आठवले, जितेश शार्दुल, बाळासाहेब शिंदे, संजय दोंदे यांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान, याबाबत वंचित आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महापालिका प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांच्या समस्यांची दखल घेत नाही. येथील रस्ते गेले अनेक दिवस नादुरुस्त आहेत.

मात्र प्रशासनाने काहीही केलेले नाही. राजकीय दबावातून शहरातील विविध रस्त्यांवर वारंवार डांबरीकरण केले जाते. मात्र अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांकडे महापालिका लक्ष देत नाही. त्याच्या निषेधासाठी आज आंदोलन केले आहे. प्रशासनाने तातडीने रस्तेदुरुस्ती न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com