Shivsena UBT Politics: नाशिक मध्य मतदार संघ निश्चित करणार महापालिकेची सत्ता?

Vasant Gite Politics; What is the upcoming politics of all the parties on the Nashik Central Constituency?-नाशिक मध्य मतदार संघात सर्व समाज घटक आणि वर्गातील मतदार असल्याने महाविकास आघाडीला त्यात रस आहे.
Uddhav Thackrey, Sharad Pawar & Balasaheb Thorat
Uddhav Thackrey, Sharad Pawar & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Congress News: विधानसभा निवडणूक आणि नाशिक महापालिकेचे सत्ता याचे एक अजब राजकीय समीकरण आहे. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघात तिन्ही घटक पक्षांना रस आहे. या निवडणुकीचे परिणाम शहरातील आगामी राजकारणावर होतील.

नाशिक मध्य मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात विविध पक्षाच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी या मतदारसंघात प्रमुख इच्छुक आहेत.

शहरातील या मतदार संघात राजकीय हालचाली अतिशय गतिमान आहेत. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार सातत्याने वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात देखील स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, हिमगौरी अडके- आहेर, लक्ष्मण सावजी अशा विविध इच्छुकांना उमेदवारीची अपेक्षा आहे.

या मतदार संघात सर्वाधिक चुरस महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आहे. काँग्रेस पक्षाला कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ सहकारी पक्षाला सोडण्याची इच्छा नाही. शिवसेना ठाकरे गटाला कोणत्याही स्थितीत येथून आपल्याच उमेदवार द्यायचा आहे. या दोन्ही पक्षांतील चुरस एका वेगळ्याच कारणाने असल्याचे बोलले जाते.

Uddhav Thackrey, Sharad Pawar & Balasaheb Thorat
Sharad Pawar politics: भुजबळांविरोधात मोर्चेबांधणी, शरद पवार आज भुजबळ विरोधकांना काय कानमंत्र देणार?

नाशिक मध्य मतदार संघ आणि महापालिका निवडणुका यांचे एक वेगळे राजकीय समीकरण आहे. विधानसभेच्या 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघात मनसेचे आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.

तेव्हा महापालिकेत मनसेचा महापौर झाला. 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या अर्थात तिन्ही जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली.

यातून ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची महापालिकेत सत्ता असे एक राजकीय समीकरण तयार झाले आहे. या समीकरणा नुसार भारतीय जनता पक्षाला शहराच्या राजकारणात कमकुवत करावयाचे असेल तर शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना जागा मिळाली पाहिजे. तसे झाले तरच राजकीय समतोल साध्य होईल.

Uddhav Thackrey, Sharad Pawar & Balasaheb Thorat
Rajendrakumar Gavit: उत्तर महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघावर बंडखोरीचे सावट; विद्यमान आमदाराची डोकेदुखी वाढणार

आगामी काळात महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला प्रभाव दाखवता येईल. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांसह काँग्रेसला भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने सध्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदार संघ कळीचा मुद्दा ठरला आहे.

महापालिकेतील अनेक इच्छुक उमेदवार देखील त्यासाठीच आटापिटा करताना दिसतात. महापालिका आणि विधानसभा निवडणूक यांचे नाशिक शहरातील हे राजकीय समीकरण त्याला कारणीभूत आहे. ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही प्रभावी दिसेल का? याची सध्या चर्चा आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com