Vasant Gite Politics: वसंत गीते म्हणतात, येत्या 20 नोव्हेंबरला नाशिक `ड्रग्ज मुक्त` होणार!

Vasant Gite; Shivsena candidate Gite criticized BJP MLA Devyani Pharande on drugs issue-नाशिक शहराला ड्रग्सचा विळखा पडला असून युवा वर्गाला वाचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Devyani Pharande & Vasant Gite
Devyani Pharande & Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024: शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पक्षातील आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट ते शिगेला पोहोचले आहे. त्यामुळे नाशिक मध्य मतदार संघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शुक्रवारी शहरात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाशिक शहरातील अमली पदार्थांचा प्रसार आणि त्याला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून दिली जाणारी मदत याचा थेट उल्लेख केला. याबाबत पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची गरज असल्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

Devyani Pharande & Vasant Gite
Uddhav Thackrey Politics: ठाकरे इफेक्ट; शिवसेनेत जोरदार इन्कमिंग, मनसे, भाजपला झटका!

https://www.sarkarnama.in/topic/devyani-pharande

नाशिक मध्य मतदार संघातील उमेदवार माजी महापौर वसंत गीते यांनी भाजपच्या आमदारांवर थेट टीका केली. मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा गवगवा केला जातो आहे. राज्याची तिजोरी रिकामी असताना कोट्यावधीची कामे कशी होऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिककरांची सध्या फसवणूक केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पन्नास कोटीचे काम दाखवून दहा लाखांचा नाममात्र निधी टोकन म्हणून दाखविला जातो. त्यामुळे घोषणा होणारी किती कामे प्रत्यक्षात येतील, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

Devyani Pharande & Vasant Gite
Uddhav Thackrey : उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना भरला दम; म्हणाले, याद राखा...

माजी महापौर गीते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर ड्रग्जच्या व्यवसायातील गुन्हेगारांना शहराच्या लोकप्रतिनिधींनी जामीनावर मुक्त केले आहे. चिपड्या नावाच्या या गुन्हेगाराला जामीन मिळाल्यावर शहराच्या आमदारांनी सहकुटुंब जाऊन त्याचा सत्कार केला. त्याबाबतची छायाचित्रे समाज माध्यमांवर झळकली. या लोकप्रतिनिधी नाशिक शहराचा विकास करण्यासाठी आहे की, नाशिक शहराला अमली पदार्थांची चटक लावण्यासाठी निवडून आले आहेत, असा प्रश्न देखील त्यांनी केला.

शहरात अमली पदार्थांची विक्री आणि व्यापार जोरात सुरू आहे. या विक्रेत्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. शहरातील आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अमली पदार्थातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून शहरातील आमदार प्रयत्न करतात. त्यांना पोलीस ठाण्यातून सोडविण्यासाठी फोन करतात.

अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील `छोटी भाभी` हिला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहरातील आमदाराने तिला सोडविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबाबत असंख्य दूरध्वनी पोलिसांनी केल्याचे बोलले जाते. त्याचे दुरध्वनी संभाषण उपलब्ध होऊ शकते. पोलिसांनी त्यांचे कॉल डिटेल तपासावे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार गीते यांनी केली आहे.

माजी महापौर गीते यांच्या या आरोपांमुळे निवडणुकीला पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाची किनार प्राप्त झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत शहराच्या विकासाऐवजी अमली पदार्थांचे व्यवसाय आणि त्यातील गुन्हेगार याचीच अधिक चर्चा होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूचे नेते ही चर्चा थांबविण्याऐवजी ती अधिक वाढविण्यावरच भर देत असल्याचे चित्र आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com