Uday Samant : `वेदांता फॉक्सकॉन` प्रकल्पावरून राजकारण पुन्हा पेटणार?

Vedanta Foxcon project likely to rekindle politics in the state-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी `वेदांता फॉक्सकॉन` सह चार प्रकल्पांबाबत सोमवारी श्वेतपत्रिका सादर करणार असल्याची माहिती दिली.
Uddhav Thckeray & devendra Fadanvis
Uddhav Thckeray & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP politics : वेंदाता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत राजकारण पेटले होते. या विषयावर येत्या सोमवारी श्वेतपत्रिका सादर करेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. त्यामुळे या विषयावरील राजकारणाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Government likely to present white paper on Vedanata & other three projects)

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात (Gujrat) का गेला यावर उहापोह करण्याची गरज आहे. त्यामुळे त्याचे नेमके कारण जनतेसमोर आले पाहिजे. त्यामुळे यावर श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उद्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते.

Uddhav Thckeray & devendra Fadanvis
Ratan Tata News : रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार!

उद्योग विभागातर्फे २७ परवानग्या एकाच ठिकाणी देण्याबाबतचे मैत्री योजनेचे विधेयक आज विधानपरिषदेत सादर करण्यात आले होते. त्यावर विविध सदस्यांनी चर्चेत काही मुद्दे उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी उत्तरे दिली.

यावेळी ते म्हणाले, २०१९ आणि २०२० या वर्षामध्ये महाराष्ट्र देशात उद्योगक्षेत्रात पहिल्या क्रमांकावरच आहे. हे सर्व्हेक्षण राज्य शासनाने नव्हे तर स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहे. गेल्या दहा महिन्यात आम्ही विशेष दक्षता घेतली आहे. त्यामुळेच एक लाख १८ हजार कोटींची परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे.

Uddhav Thckeray & devendra Fadanvis
Tigers & Politics : पक्षांतले वाघ कमी झाले, पण राज्यात मात्र वाघ घेता वाघ अशी स्थिती!

मात्र कोणताही उद्योग राज्याबाहेर जाता कामा नये यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. यामध्ये राजकारण करायचे नाही, परंतु त्याचा उहापोह झाला पाहिजे. त्यामुळेच वेदांता फॉक्सकॉनसह चार प्रकल्पांबाबत येत्या सोमवारी श्वेतपत्रिका विधीमंडळाला सादर करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

Uddhav Thckeray & devendra Fadanvis
NCP Saroj Ahire News: राष्ट्रवादी देणार आमदार सरोज अहिरेंना पर्याय!

यावेळी सामंत म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाने आपल्याकडे २२ जानेवारी २०२२ रोजी अर्ज केला होता. त्यांना आपण पुण्याला दोन हजार एकर जमीन दाखवली. मात्र तसे करताना पाणी व अन्य सुविधांबाबत विचार केला नाही. ती जमीन इको सेन्सेटीव्ह झोनमधील होती. विशेष, म्हणजे त्यांना नेमका प्रस्ताव दिला नाही. तो देण्याचा अधिकार मंत्रीमंडळ उपसमितीला असतो. त्या समितीची बैठक दहा महिने झालीच नव्हती, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर कटाक्ष केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com