Shivsena UBT Politics : उद्धव ठाकरे दूर करणार विजय करंजकरांची नाराजी?

Loksabha Election 2024 : उमेदवारी हुकलेले लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर उद्या उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.
vijay Karanjkar
vijay KaranjkarSarkarnama
Published on
Updated on

Nashik constituency 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवारी हुकलेले लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

करंजकर (Vijay Karanjar) यांनी वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी याबाबत उमेदवारी करण्याचे संकेतदेखील दिले होते. शिवसेनेच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर करंजकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र गेल्या सहा दिवसांपासून करंजकर यांना भेट मिळू शकलेली नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबई बाहेर असलेले पक्षप्रमुख ठाकरे मुंबई परतले आहेत. त्यामुळे उद्या करंजकर यांना मातोश्रीवर ठाकरे यांच्या भेटीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. याबाबत करंजकर यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षप्रमुखांची भेट घेतल्यानंतरच आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत. तोपर्यंत माध्यमांशी बोलण्याचे टाळणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

vijay Karanjkar
Dhule Loksabha 2024 : धुळ्यात भाजपच्या मदतीला 'वंचित'चा उमेदवार?

दरम्यान, स्थानिक नेत्यांनी ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्क करून करंजकर यांना भेट देण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचाराला शिवसेना ठाकरे (shivsena) गटांनी नाशिकमध्ये सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये सिन्नर मतदारसंघात प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Loksabha) प्रमुख करंजकर यांना प्रचारात सहभागी करण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला अद्याप करंजकर यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पक्षप्रमुख ठाकरे करंजकर यांची समजूत घालण्यात यशस्वी होतील. त्यानंतर ते आपले नाराजी सोडून देतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजकर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पक्षाने त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. त्यावेळीदेखील कोणत्याही स्थानिक नेत्यांशी संपर्क केलेले नव्हता. आता लोकसभेचा उमेदवार पक्षाने जाहीर केला आहे. त्यामुळे करंजकर यांनी आपली नाराजी सोडून पक्षाच्या प्रचारात सहभागी झाले पाहिजे. त्यात कोणतीही अडचण दिसत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते करंजकर यांची नाराजी नक्कीच दूर करतील. शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटात कोणताही वाद राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Rashmi Mane

R

vijay Karanjkar
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com