Vijay Wadettiwar Politics : वडेट्टीवार म्हणतात, युवकांनी आपली शक्ती लढ्यासाठी वापरावे, आत्महत्या नकोच!

Government stop conflicts in society OBC Reservation keep intact said Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात ओबीसी संघटनांशी चर्चा केली.
Congress leader Vijay Wadettiwar
Congress leader Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

OBC Reservation News : ओबीसी आरक्षणाविषयी समाजामध्ये गोंधळाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर लातूर पाठोपाठ बीड येथे आत्महत्येची घटना झाली. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याची शासनाने घोषणा केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी पुणे शहरात ओबीसी संघटनांची बैठक घेतली.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबत भूमिकेमुळे काही संघटना आणि नेते आक्रमक आहे. लातूर आणि बीड इथल्या ओबीसी युवकाने आत्महत्या केली. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

आज पुणे (Pune) शहर काँग्रेस कार्यालयात परिसरातील विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी घटकातील जातींवर अन्याय होता कामा नये. याबाबत राज्य शासनाने पारदर्शी भूमिका घेतली पाहिजे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Congress leader Vijay Wadettiwar
BJP MP Ujjwal Nikam legal notice : उज्ज्वल निकमांची नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत लीगल नोटीस

बीड येथील घटनेबाबत विजय वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केली. ते 'सरकारनामा'शी बोलत होते. ते म्हणाले राज्य सरकारने भूमिका घेताना सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत ओबीसींमध्ये आरक्षण घटनार ही भीती निर्माण होणे योग्य नाही.

Congress leader Vijay Wadettiwar
Delhi Police FIR Congress: PM मोदी अन् त्यांच्या आईवर व्हिडिओ बनवणं काँग्रेसला भोवलं; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

कोणीही आत्महत्येसारखी टोकाची भूमिका अजिबात घेऊ नये. ओबीसी युवकांनी असे प्रकार टाळावे. आपली शक्ती आरक्षणाच्या लढ्यासाठी वापरली पाहिजे.

खरे तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवताना 50 टक्क्यांची मर्यादा दूर करण्याचा निर्णय हा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा राजमार्ग आहे. त्याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com