Vikram Pachapute Won Election : भाजपने ऐनवेळी उमेदवारी बदलली, पाचपुतेंनी विजयाचा 'विक्रम' घडवला

Vikram Pachapute Won Shrigonda Assembly Election 2024 final result : श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते, अनुराधा नागवडे आणि माजी आमदार राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढती होती.
Vikram Pachapute
Vikram PachaputeSarkarnama
Published on
Updated on

Shrigonda Assembly Election 2024 final result : श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने विजयरथ कायम ठेवण्याचे शिवधनुष्य विक्रमसिंह पाचपुते यांनी पेचललं. भाजपचे बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांचा 36 हजार 773 मतांनी विजय झाला.

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचा पराभव झाला. इथं तिरंगी लढत झाली. मतविभागणीमुळे नेमकं गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता असतानाच, विक्रमसिंह पाचपुते यांनी विजयाच्या रथात स्वार झाले.

विक्रमसिंह पाचपुते यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी ठेवली होती. भाजपचे (BJP) पाचपुते यांनी निवडणूक विजयाच्या आणि विकासात्मक मुद्यांवर लढली. भाजपचे विक्रम पाचपुते यांना 99 हजार 005 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना 53 हजार 176 यांना मते मिळाली. काँग्रेसचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना 27 हजार 850 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप यांना 62 हजार 178 मते मिळाली.

Vikram Pachapute
Radhakrishna Vikhe Won Election : राधाकृष्ण विखेंचा दणदणीत विजय; म्हणाले, 'विजय जनतेला समर्पित'

श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी जाहीर करण्यावरून नाट्यमय घडामोडी झाल्या. भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या आजारपणामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जात मुलगा विक्रमसिंह पातपुतेंना मैदानात उतरवले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र असतानाच, हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला. यामुळे राहुल जगताप यांची कोंडी झाली. त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

Vikram Pachapute
Vitthalrao Langhe Won Nevasa : विठ्ठलराव लंघे ठरले 'जायंट किलर', विजयाचा गुलाल घेत गडाखांना दिला धक्का

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या अनुराधा नागवडे यांची देखील महायुतीत अशीच कोंडी झाली. नागवडे यांनी ही कोंडी फोडली आणि त्यांनी अजितदादांची साथ सोडली आणि कोणत्याही परिस्थितीत पक्षाकडून उमेदवारी करण्याचा निर्धार केला. शिवसेना ठाकरे पक्षाकडून दुसऱ्या दिवशी उमेदवारी घेऊन आले. यामुळे राहुल जगताप समर्थक भडकले आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. अनुराधा नागवडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इथं प्रचार सभा घेऊन महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी नागवडे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

राहुल जगताप यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहत जोरदार प्रचाराला सुरवात केली. शिवसेना नेता खासदार संजय राऊत यांनी राहुल जगताप यांच्या बंडखोरीची दखल घेत शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. शरद पवार यांनी सूचना देऊन देखील ते निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने शेवटी त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. या तिघांमध्ये झालेल्या लढतीत राहुल जगताप यांचे पारडे देखील जड होते. त्यांच्याकडे युवकांचे संघटन मोठे होते. परंतु नागवडे यांच्याकडे सहानुभूतीची लाट होती. राहुल जगताप यांना आमदार करण्यात नागवडे यांनी माघार घेत एकनिष्ठपणे प्रचार केला होता. त्याचा फायदा नागवडे यांनी या निवडणुकीत घेतला.

पाचपुतेंचा विकास मुद्यांवर प्रचार

काँग्रेसमध्ये गेलेले घनश्याम शेलार निवडणुकीच्या रिंगणात राहण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला होता. ऐनवेळी शेलार यांनी नागवडे यांना पाठिंबा दिला. परंतु त्यांना देखील चांगली मते मिळाली. 2014 मधील निवडणुकीत राहुल जगताप यांना निवडून आणण्यात घनश्याम शेलार यांचा मोठा वाटा होता. तसेच 2019च्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत भाजपचे पाचपुते यांना कडवे आव्हान दिलं होते. विक्रमसिंह पाचपुते यांनी लिलया पेललं. अनुराधा नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि घनश्याम शेलार यांच्या कोणत्याही राजकीय खेळीमध्ये न गुंतता, पाचपुते यांनी एकतर्फी सुरू ठेवलेला प्रचार कार्यक्रम त्यांना विजयाजवळ घेऊन गेला.

2024 मधील उमेदवार

विक्रम बबनराव पाचपुते (BJP), महेंद्र दादासाहेब शिंदे (BSP), अण्णासाहेब सीताराम शेलार (VBA), विनोद साहेबराव साळवे (SaSP), दादा बबन कचरे (RSPS), गोरख दशरथ आलेकर (JLP), संजय हनुमंत शेळके (MNS), अनुराधा राजेंद्र नागवडे (SSUBT), रत्नमाला शिवाजी ठुबे (अपक्ष), अनिल काशिनाथ कोकाटे (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), राहुल कुंडलिकराव जगताप (अपक्ष), नवशाद मुनसिलाल शेख (अपक्ष), राहुल संजय छत्तीसे (अपक्ष), सुवर्णा सचिन पाचपुते (अपक्ष), सागर रतन कासार (अपक्ष), अण्णासाहेब सीताराम शेलार (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

2019 च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते भाजपच्या तिकिटावर श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत उभे होते. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम प्रतापराव शेलार यांच्याशी झाला होता. बबनराव पचपुते यांनी ही लढत जवळपास 4 हजार 750 मतांच्या फरकाने जिंकली. घनश्याम शेलार यांना 98 हजार 508 मते मिळाली, तर बबनराव पचपुते यांना 1 लाख 3 हजार 258 मते मिळाली. विधानसभा 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना राहुल जगताप यांना 99 हजार 281 मते मिळवत विजय मिळवला होता. ऐनवेळी भाजपकडे गेलेले बबनराव पाचपुते यांना 85 हजार 644 मते मिळाली होती. या निवडणुकीत पाचपुते यांचा पराभव झाला होता. यावेळी शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे 22 हजार 54 आणि काँग्रेसचे हेमंत ओगले 5 हजार 113 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com