Vivek Kolhe : विवेक कोल्हेंचा आरोपांचा 'अग्निबाण'; 'सरकारी पाहुण्यांनी आता 'त्यांच्या' गुन्ह्यांची...'

Nashik Teacher Vidhan Parishad Constituency Election : संजीवनी सहकारी साखर कारखान्याची सरकारी यंत्रणांनी तपासणी केल्यानंतर त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. विवेक कोल्हे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन नाशिक शिक्षक मतदारसंघात कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा इशारा दिला.
Vivek Kolhe
Vivek Kolhe sarkarnama
Published on
Updated on

Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थांची सरकारी यंत्रणेने गेल्या तीन दिवसात केलेल्या तपासणीला संयमाने समोरे गेले.

या तपासणीत काहीच निष्पन्न न झाल्याने, आता याच सरकारी यंत्रणेने नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदारावंर असणाऱ्या गुन्ह्यांबाबत आणि इतर प्रलंबित प्रकरणांबाबत गांभीर्याने चौकशीचे धाडस दाखवून कारवाई करावी, अशी मागणी केली. विवेक कोल्हे यांनी थेट आमदार किशोर दराडे यांच्यावर निशाणा साधल्याने निवडणूक टोकाची होणार असल्याचे संकेत मिळाले.

विवेक कोल्हे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर 2 जून, 7 जून आणि 11 जून या दिवस सरकारी यंत्रणांने तपासणी केली. यात पुणे (PUNE), संभाजीनगर, जालना येथील सरकारी यंत्रणांची पथके होती. त्यांनी सखोल प्रकारची कारखान्याच्या कारभाराची चौकशी केली मात्र त्यांना काहीही साध्य झाले नाही. अनियमित कामे कारखान्याकडून कधीही होत नाही, असे सांगत नाशिक (Nashik) शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी या प्रकारावर पत्रकार परिषद घेत भाष्य केले.

Vivek Kolhe
Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा मोठा आरोप; ''NEET' परीक्षेत एक नव्हे तर, चार घोटाळे'

विवेक कोल्हे म्हणाले, "सहकार चळवळ उभी करण्यामध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान राहिली आहे. मागील 60 वर्षाच्या इतिहासात कारखान्यावर कधीही सरकारी यंत्रणा तपासणीसाठी आली नाही. मात्र आता सलग तीन वेळेस सरकारी यंत्रणेने येत कष्ट घेतले. सरकारी यंत्रणेचे स्वागत करावे की, दुर्दैव म्हणावे, हेच कळत नाही. कारण कारभार स्वच्छ असल्याने त्यांच्या हाती काहीच सापडले नाही आणि सापडणार देखील नाही". नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडणूक अपक्ष लढवावी, अशी कार्यकर्ते व शिक्षकांची भावना होती. यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मागील आमदारांनी नेतृत्व करताना शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. सरकार ईडी, सीबीआयचे (CBI) छापे कुठेही टाकू शकते तो त्यांचा अधिकार आहे. मात्र संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे. सरकारी यंत्रणेने ज्यापद्धतीने तपासणी केली, त्याच तत्परतेने विद्यमान आमदारांवर असणाऱ्या गुन्ह्यांबाबत आणि इतर प्रलंबित कामाबाबत तातडीने कारवाई करणार का, असा प्रश्न विवेक कोल्हे यांनी केला.

Vivek Kolhe
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

नाशिक शिक्षक मतदारसंघाची अपक्ष निवडणूक लढत आहे. सरकारी यंत्रणा समोर आणून एक प्रकारचा दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न होता. या निवडणुकीत मला चांगले यश मिळणारच आहे. मतदारसंघातून शिक्षकांना त्यांचं नेतृत्व हवे आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राज्यातील शिक्षकांची अनेक प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. त्यामुळे कोणाच्याही दबावाला आपण बळी पडणार नाही. कारण आपला संघर्षाचा वारसा आहे, असे विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

सत्ताधारी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर अनेक गुन्हे आणि केसेस सुरू असल्याचे आरोप आहेत. फसवणुकीचे गुन्हे असणारे शिक्षकांनाही फसवू शकतात ही राज्याच्या राजकारणासाठी दुर्दैवी बाब आहे. आता माझ्या बाजूने 26 जुनला मतांचा पाऊस पडेल, असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.

कुणाच्या आदेशाने ही सरकारी यंत्रणा आली, याची कल्पना नाही. पण अर्ज दाखल केल्यानंतर हे सरकारी पाहुणे आले. 18-18 तास चौकशी करूनही कारभार पारदर्शक असल्याने हाती काहीच लागलं नाही. ज्यापद्धतीने आमच्याकडे सरकारी पाहुणे आले, त्याच तत्परतेने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर दाखल गुन्ह्यांवर कारवाई करतील का ? आणि सरकारने तशी चौकशी केल्यास पारदर्शकपणे करावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com