Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

Kishor Darade : नाम साधर्म्य असल्याने किशोर दराडे या अपक्ष उमेदवाराला शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तथा उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून मारहाण झाली होती
Kishor Darade
Kishor Darade Sarkarnama

Nashik,09 June : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीने धक्कादायक वळण घेतले आहे. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना मारहाण झाली होती. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी आता आयुक्त प्रवीण गेडाम पुढे आले आहेत.

नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत (Nashik Teachers constituency) अनेक रंजक घटना आणि घडामोडी घडत आहेत. नाम साधर्म्य असल्याने किशोर प्रभाकर दराडे (Kishor Prabhakar Darade) या अपक्ष उमेदवाराला शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी मारहाण केली होती. त्यानंतर उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना पोलिसांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले होते.

गेल्या तीन दिवसांपासून मात्र अपक्ष उमेदवार दराडे बेपत्ता आहेत. ते घरी पोहोचलेले नाहीत, त्यांना घरी सोडण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र पोलिसांवरही राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे कुठे गायब झाले? ते बेपत्ता आहेत की त्यांचे अपहरण झाले? यावर चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात पोलिसांत कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, अपक्ष उमेदवार दराडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयात मारहाण झाली होती. त्यामुळे यात आता आयुक्त गेडाम यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करण्यात येईल. पोलिसांनी मागणी केल्यास त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला पाहिजे. सहायक पोलिस आयुक्त याबाबत योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा आयुक्त गेडाम यांनी व्यक्त केली.

Kishor Darade
ShahajiBapu & Baban Shinde : बबनदादा, शहाजीबापूंची धाकधूक वाढली; पंढरपूरमधील 57 गावांत मोहिते पाटलांना मताधिक्य

दरम्यान अपक्ष उमेदवार दराडे हे कोपरगाव येथील आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील प्रचंड धास्तावलेले आहेत. त्यांचे वडील घटना घडली त्या दिवशी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आले होते. त्या दोघांना पोलिस गाडीतून नेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र राजकीय दबाव आणून त्यांचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा आहे.

अपक्ष उमेदवार दराडे आणि त्यांचे वडील सध्या एका आमदाराच्या ताब्यात आहेत, असे बोलले जाते. त्यांना मुंबईला दाबून ठेवल्याचे कळते. या सर्व दबावामुळे अपक्ष उमेदवार दराडे आणि त्यांचे कुटुंबीय मात्र प्रचंड धास्तावलेले आहेत. शिक्षक या आदर्श पेशा असलेल्या मतदारांच्या निवडणुकीत असे प्रकार घडत असल्याने मतदारांतही चिंता आहे. त्याचे परिणाम मतदानातून दिसून येतील, असे बोलले जाते.

Kishor Darade
Dilip Walse Patil : शिवाजीराव आढळरावांचा शिरूरमध्ये पराभव ; दिलीप वळसे पाटलांच्या अश्रूंचा बांधच फुटला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com