Jalgaon News: आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहे!

Gulabrao Patil On Uddhav Thackeray: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Uddhav Thackeray & Gulabrao Patil
Uddhav Thackeray & Gulabrao PatilSarkarnama

Gulabrao Patil News : ‘बाळासाहेबांचे नाव वापरू नका’, हे उद्धव ठाकरे अनेक वेळेस बोलले आहेत. त्यामुळे त्याला फार महत्व दिल्यास ते मला चुकीचे होईल असे वाटते. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे राहिलो आहे. त्यांचे शब्दप्रयोग माहिती आहेत. त्यामुळे आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. (Guardian Minister reply to Uddhav Thackeray)

पाचोरा (Jalgaon) येथील सभेत शिवसेना (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री पाटील (Gulabrao Patil) यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते अजिंठा विश्रामगृहात बोलत होते.

Uddhav Thackeray & Gulabrao Patil
Uday Samant : खोक्याची धास्ती...मंत्री सामंत म्हणाले, `खोक्यात काय ते सांगा`

ते म्हणाले, की बाळासाहेब ही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही; मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. पण बाळासाहेब या देशाची प्रॉपर्टी आहे. तमाम जनतेसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचे नाव कुणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महानगर, ममुराबाद, नशिराबाद व मेहरूण परिसरातील शेख इकबाल शेख सलीम, अखिल मुलतानी, अजमल मिर्झा, शरीफ शह धीरज सरपटे, मजीद शेख, जुबेर शाह, आमीन शेख, सलीम खाटीक, साजिद शेख, रईस पटेल, अब्दुल पटेल, समीर पटेल, बाबू मुलतानी, सोहेल मुलतानी, दानिश मुलतानी यांच्यासह अनेक मुस्लिम व इतर युवक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Uddhav Thackeray & Gulabrao Patil
Vanchit Aghadi News : वंचित युवा आघाडी ॲक्शन मोडवर, आंदोलनांतील गुन्हे परत घेण्यासाठी करणार एलगार !

या वेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मंत्री पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी शेख इकबाल शेख सलीम यांची जळगाव महानगरच्या उप शहरप्रमुखपदी निवड करण्यात येऊन मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला संपर्कप्रमुख सरिता माळी-कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सोहम विसपुते, अजय देशमुख, नगरसेवक दिलीप पोकळे, कुंदन काळे, चेतन सनकत यांच्यासह आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com