Prakash Ambedkar News : '' आम्ही 'इंडिया' आघाडीत येण्यास इच्छुक, पण...'' ; 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी 'ही' अट ठेवली समोर

Mahavikas Aaghadi & INDIA : ...यावर 'वंचित'चे इंडिया आघाडीतील इन्कमिंग ठरणार आहे.
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : देशातील प्रमुख विविध 28 राजकीय पक्षांनी एकत्रित येत इंडिया या नावाने विरोधी पक्षांची आघाडी तयार केली आहे. या आघाडीची बैठक गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असून याबाबत वंचित बहुजन आघाडी यामध्ये नसल्याबद्दल चर्चा आहे. नगर जिल्ह्यात आलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही इंडिया आघाडीमध्ये येण्यास इच्छुक आहोत, मात्र, आम्हाला बिनबुलाये मेहमान व्हायची इच्छा नाही, अशी टिपण्णी केली आहे.

हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांच्या अमानुष मारहाणी घटनेची माहिती घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर श्रीरामपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना 'वन नेशन वन इलेक्शन' मुद्यावरुन भाजपवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) निश्चितच इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर 'वंचित'च्या सहभागाविषयी इंडिया आघाडीशी बोलतील असा विश्वासही व्यक्त केला.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
Sharad Pawar Speech : 'ते आले तर ठीक, अन्यथा दूर लोटण्यासाठी सर्वकाही करू' ; शरद पवारांचा रोख कुणाकडे ?

एकंदरीत प्रकाश आंबेडकर विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये येण्यास इच्छुक असले तरी त्यांना सन्मानाने यामध्ये बोलवण्यात यावं अशी एकूणच त्यांची इच्छा दिसून येत आहे. मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून प्रकाश आंबेडकर यांना मिळणारा प्रतिसाद हवा तसा दिसून येत नाही.

एकूणच यामुळे शिवसेनेची तयारी असली तरी येत्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीबाबत इंडिया आघाडीत घेण्याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यानंतर वंचितचे इंडिया आघाडीतील इन्कमिंग ठरणार आहे. यामध्ये निश्चितच उद्धव ठाकरे यांना आता महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Sharad Pawar
Rahul Gandhi News : 'इंडिया'ची बैठक संपताच राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज ; म्हणाले, ''...२०२४ ला भाजपचं जिंकणं अशक्य ! ''

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवणार अशा बातम्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी, मी केवळ पुणेच नाही तर मोदी हे चेन्नई त्याचबरोबर बंगलोर या ठिकाणाहूनही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मला समजली आहे. त्यांनी कुठून निवडणूक लढवावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी आपला मतदार संघ निश्चित करावा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com