Uddhav Thackeray On INDIA
Uddhav Thackeray On INDIASarkarnama

Uddhav Thackeray On INDIA : आम्ही भारताला इंडिया म्हणू किंवा 'हिंदुस्थान; ठाकरेंनी मोदींना जोरदार ठणकावलं !

Uddhav Thackeray On Narendra Modi : "आजचे पोलादी पुरुष म्हणवून घेणारे मणिपूरमध्ये कारवाई करू शकत नाहीत."

Jalgaon News : देशाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टोले लगावले आहेत. "आधी हे म्हणायचे आम्हाला विरोधकच नाही, पण आता घाबरले आहेत. इंडिया नावाची त्यांना खाज सुटलेली आहे. भारत देश हा आमचा आहे. आमच्या भारताला आम्ही इंडिया म्हणू, नाहीतर हिंदुस्थान म्हणू ते आम्ही पाहू. बरं झालं यांनी देशालाच स्वत:चं नाव दिलं नाही हे नशीब," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray On INDIA
Uddhav Thackeray Latest Speech : भाजप-संघाकडे महापुरुष नाहीत, म्हणून दुसऱ्यांचे चोरतात; ठाकरेंचा घणाघात !

उद्धव ठाकरे म्हणाले, "सरदार वल्लभभाई पटेल यांनी फौजा घुसवून निजामाची सत्ता खालसा केली होती, मणिपूरमध्ये कारवाई करण्याची यांची हिंमत नाही हे कसले पोलादी पुरुष हे तर तकलादू आहेत," अशी टीकाही ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.

जळगाव येथे महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, लेवा पाटील समाजाचे कुटुंब प्रमुख रमेश विठू पाटील उपस्थित होते.

Uddhav Thackeray On INDIA
Sangli NCP News : विट्याचे पाटील जयंतरावांच्या तालुक्यात करणार अजितदादांचा जंगी सत्कार !

ठाकरे म्हणाले की,"सरदार पटेल यांच्या कार्यामुळे त्यांना लोहपुरुष ही उपाधी जनतेने दिली आहे, आज काही जण पोलादी पुरुष म्हणवून घेतात, परंतु ते नावालाच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले, "सरदार पटेल यांनी फौजा मराठवाड्यात घुसवून निजामाला पळवून लावले, आजचे पोलादी पुरुष म्हणवून घेणारे मणिपूरमध्ये कारवाई करू शकत नाहीत. हे पोलादी नव्हे तकलादू पुरुष आहेत. मोदी यांनी सरदार पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभा केला आहे, परंतु त्यांच्या कार्याची उंची केव्हा गाठणार?" असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com