Uddhav Thackeray Latest Speech : भाजप-संघाकडे महापुरुष नाहीत, म्हणून दुसऱ्यांचे चोरतात; ठाकरेंचा घणाघात !

Uddhav Thackeray On Rss And Bjp : "राजीनामा घेतला नसता तर मी कुणाला तोंड दाखवू शकलो नसतो."
Uddhav Thackeray Latest Speech
Uddhav Thackeray Latest Speech Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावात छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळा अनावरणाबाबत शासनाने स्थगिती दिल्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाकडून अनावरण करण्यात आले. या स्थगितीला न जुमानता पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्यांचे अनावरण झाले. यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज माझ्या सभेसाठी आपण मोठ्या संख्येने आलात, सर्वांचा आभारी आहे. पण काहींना सभेसाठी माणसं भाड्याने आणावी लागतात, पण ही शिवसैनिकांची गर्दी आहे. या आधीही मी पाचोऱ्याला येऊन गेलो. त्यावेळी माझ्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कार्याचं भूमिपूजन झालं. मी तेव्हा वचन दिलं होतं की, पुतळ्याच्या अनावरणासाठी मी येणार. जो शब्द दिला तो मी पाळतो. मी दिलेला शब्द विसरत नाही, हीच बाळासाहेबांची शिकवण होती. "

Uddhav Thackeray Latest Speech
Flex war In Shiv Sena : ठाकरे गटाकडून ‘त्या’ बॅनर्सला सणसणीत उत्तर; ‘कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी मी शिवसेना...’

"जळगावने प्रगतीचा वेग धरला होता. पण तुम्हीच मोठी केलेल्या माणसांच्या डोक्यात हवा शिरली. आता या गद्दारांना तु्म्हीच जागा दाखवली पाहिजे. कोण आडवं येतो तेच मी पाहतो. या गद्दारांच्या डोक्यात बुद्धी नाही. नुसता खोका आहे. मात्र आजचं हे मैदान आपलं आहे. येत्या काळात केंद्रात आणि राज्यात हे सरकार राहणार नाही, याची तयारी करा," असे ठाकरे म्हणाले.

"गुजरातमध्ये सरदारांचा सर्वात उंच पुतळा उभारला. कारण भाजपने आणि त्यांच्या मातृसंघटनेला महापुरुष घडवता आले नाहीत. म्हणून हे दुसऱ्यांचे महापुरुष चोरायला लागले. कधी सरदार पटेलांची चोरी केली, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची चोरी केली. त्याच्या जोरावर आज हे दहीहंड्या उभारत आहेत," असा घणाघात ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray Latest Speech
Dhule NCP News : धुळ्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साकडे

"मणिपूरमध्ये अत्याचार झाले. महिलांची विटंबना करण्यात आली. मात्र, आपले पंतप्रधान G20 परिषदेत व्यस्त आहेत. जगातल्या नेत्यांशी हे काय बोलतात आणि यांना काय कळतं ? माहिती नाही, पण नुसता फोटो आला पाहिजे. नुसती चमकोगिरी करायची, पण मणिपूरला जायला तयार नाहीत. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा काही अधिकार नाही. माझ्या मंत्रिमंडळात एका मंत्र्यावर आरोप झाला, तेव्हा मी राजीनामा घेतला होता. राजीनामा घेतला नसता तर मी कुणाला तोंड दाखवू शकलो नसतो, कारण माझ्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com