Chhagan Bhujbal : गिरीश बापट यांच्या निधनाने ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड

गिरीश बापट यांच्या निधनाने विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
Girish Bapat & Chhagan Bhujbal
Girish Bapat & Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : (Nashik) खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दीर्घ आजाराने पुणे (Pune) येथे निधन झाले. या बातमीने अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली आहेत. (Chhagan Bhujbal pay homage to BJP leader Girish Bapat)

Girish Bapat & Chhagan Bhujbal
Muktainagar News : वंचिताच्या घरांसाठी रक्षा खडसे यांनी आणले ९० कोटी!

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, गिरीश बापट यांनी कामगार चळवळीपासून सुरुवात करत राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, आमदार ते खासदार पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

Girish Bapat & Chhagan Bhujbal
Jayant Patil's Statement: भाजपमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पराभव करण्याचे सामर्थ्य नाही

विधिमंडळात काम करणारे ते माझे जुने सहकारी होते. कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने सोडविले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यातील समता पुरस्कार सोहळ्यास त्यांनी नेहमीच हजेरी लावली. त्यांच्या निधनाने विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Girish Bapat & Chhagan Bhujbal
Nashik APMC News : देविदास पिंगळे, बबनराव घोलप एकत्र आल्याने विरोधक अस्वस्थ!

मी व माझे कुटुंबीय बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व मृतात्म्यास शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com