Muktainagar News : वंचिताच्या घरांसाठी रक्षा खडसे यांनी आणले ९० कोटी!

पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिलेल्यांसाठी खासदार रक्षा खडसेंनी लोकसभेत मागणी केली होती
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

मुक्ताईनगर : (Jalgaon) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) रावेर लोकसभा क्षेत्रातील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापासून वंचित लाभार्थ्यांना ९०.२८ कोटी रुपये कोटी मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भात खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी लोकसभेत केली होती मागणी. हा निधी प्राप्त झाल्याने बेघरांच्या घरांच्या कामाला गती येईल. (Centre Government sanction funds for housing scheme in Jalgaon)

Raksha Khadse
Bachchu Kadu's Statement: होय, मी गद्दारी केली; पण दिव्यांगासाठी!

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत डीपीआर-१ मध्ये स्वीकृत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारा दुसरा व तिसरा हप्ता; डीपीआर-२ मध्ये स्वीकृत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारे तीनही हप्ते मिळण्याबाबत खासदार खडसे यांनी लोकसभेत मागणी केली होती.

Raksha Khadse
Gautami Patil Lavani Show: भाजप आमदार शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम

त्यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रावेर, सावदा, फैजपूर, यावल, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, जामनेर, शेंदुर्णी, मलकापूर व नांदुरा आदी नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण रुपये ९० कोटी २८ लाख रुपये निधी वर्ग करण्यात आलेला आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारकडून मिळणारे तीनही हप्ते राज्य सरकारमार्फत देण्यात आलेले नव्हते. सदर अनुदान हे केंद्र सरकारमार्फत राज्यांना आधीच वर्ग करण्यात आलेले होते, परंतु मागील महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीमुळे संबंधित लाभार्थी आजपर्यंत आवास योजना अनुदान हप्त्याच्या लाभापासून वंचित होते.

Raksha Khadse
Jalgaon DudhSangh Fraud Case: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार; गिरीश महाजनांनी दिले 'हे' संकेत

राज्यातील सरकार बदलल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार या लाभाचे हप्ते वर्ग करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com