Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama

राजमाता जिजाऊंचे संस्कार विसरता कामा नये!

छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते रणरागिणी, समाजगौरव पुरस्कार वितरण झाले.
Published on

नाशिक रोड : राजमाता ताराराणी यांनी संघर्ष करून मराठ्यांचे साम्राज्य उभे केले आहेत, त्या खऱ्या रणरागिणी होत्या. महिलांनी त्यांचा इतिहास अभ्यासून आत्मचिंतन करावे. राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) व ताराराणी (Maharani Tararani) यांचे संस्कार विसरता कामा नये, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी केले.

Chhatrapati Sambhajiraje
शिवसेना नेत्यांच्या सत्काराला शिर्डीहून मागविला हार!

नाशिक रोड येथे छत्रपती फाउंडेशनतर्फे छत्रपती संभाजीराजे यांची संतांच्या आणि महामानवांच्या ग्रंथांनी ग्रंथतुला आणि रणरागिनी गौरव आणि समाजगौरव पुरस्कार वितरण झाले. या वेळी ते बोलत होते.

Chhatrapati Sambhajiraje
आमदार कोकाटे समर्थकांनी पराभवाची परतफेड केली

या वेळी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक गणेश कदम, अध्यक्ष सुप्रिया कदम, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, इंडियन सेक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, विभागीय अधिकारी दिलीप मेणकर, उद्योजक दीपक चंदे, सुमन कदम, करण गायकर, योगेश निसाळ, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष किशोर जाचक, बंटी भागवत, राजेश फोकणे, विक्रम कोठुळे, मंगेश मोरे, नरेश देसाई आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com