'मातोश्री, बाळासाहेब, उद्धव ठाकरेंवर कधीही टीका करणार नाही'

Gulabrao Patil| Uddhav Thakeray| उद्धव ठाकरेंना काही लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच असे दिवस आले आहेत.
Gulabrao Patil| Uddhav Thackelray|
Gulabrao Patil| Uddhav Thackelray|
Published on
Updated on

जळगाव : 'आजही आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे. आम्ही कालच सभागृहात बोललो, उद्धव ठाकरेचं (Uddhav Thackeray) आमचे साहेब आहेत. आमच्यातील कोणीही ठाकरे कुटूंबावर टीका करणार नाही, बाळासाहेबांवर तर मुळीच नाही आणि आदित्य ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. अशी प्रतिक्रिया जळगावचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Gulabrao Patil Latest news)

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, मातोश्री आमच्यासाठी आदरस्थानी आहे, मातोश्री आमचा देव्हारा आहे, देव्हाऱ्यातला देव जरी आमच्याकडे बघत नसला तरी आम्ही देवाकडे बघतो. म्हणून आम्ही कोणीही मातोश्रीवर टीका करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. उद्धव ठाकरेंना काही लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच असे दिवस आले आहेत. मी कालही सभागृहात हात जोडून विनंती केली, की अजूनही सावध रहा, या लोकांना दूर करा आणि आपलं कार्य पुढे सुरु ठेवा,अशी विनंती गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

Gulabrao Patil| Uddhav Thackelray|
शिंदे-मनसेमध्ये दिलजमाई? आमदार पाटील यांना मंत्रिपद देवून ठाण्यात नव्या समीकरणांची नांदी

मी गुवाहाटीला असताना लोकांचे फोन आले, त्यांनी परत येण्याची मागणी केली. पाटील उद्धव ठाकरेंना धोक देणार नाहीत असं सर्वांना वाटत होतं. पण ज्यावेळी आमच्या जिल्ह्यातले ४ आमदार गेले तेव्हा आम्ही २० आमदार उद्धव ठाकरेंना भेटलो आणि त्यांना परत बोलवण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे हा मराठा, बहुजन समाजाचा चेहरा आहे. ते आपल्या पक्षात असणं गरजेच आहे पण ते म्हणाले की तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीही जा, मग जर ४० आमदार एकाच वेळी जात असतील आणि त्यांना दखल घ्यायची नसेल तर काय करणार, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आम्ही बंडखोर नाही, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. बाळासाहेबांचं घर जळतयं ते घर वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे. आतापर्यंत ज्यांनी शिवसेना सोडली ते दूसऱ्या पक्षात गेले आणि त्यांनी पदं मिळवली. पण आम्ही पदं सोडून शिवसेनेला वाचवायला बाहेर पडलो आहोत. त्यामुळे आम्ही आमचं घर वाचवायला निघालो असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com