शिंदे-मनसेमध्ये दिलजमाई? आमदार पाटील यांना मंत्रिपद देवून ठाण्यात नव्या समीकरणांची नांदी

Eknath Shinde | MNS | BJP : आमदार राजू पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
Eknath Shinde | MNS | BJP
Eknath Shinde | MNS | BJP Sarkarnama

ठाणे : राज्यात शिवसेना-मनसेमधील धुसफूस उघडं आहे. त्यात कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेचे एकमेव आमदार असल्याने ठाणे जिल्ह्यात शिवसेना (Shivsena)-मनसेमध्ये (MNS) मोठ्या प्रमाणावर राजकारण पाहायला मिळते. मात्र राज्यात आता सत्तांतर होवून शिवसेना (शिंदे गट)-भाजपचे (BJP) सरकार सत्तेत आल्यानंतर ठाण्यात या दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून भाजपने त्यांच्या कोट्यातून आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला विनाअट मदत केली होती. त्यानंतर ठाकरे सरकार घालवून शिंदेंच्या सहकार्याने शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन करतानाही त्यांनी समर्थनाची भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्ष आणि विश्वासदर्शक ठराव या दोन्हीवेळी आमदार पाटील यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.

अशात मनसेनेही आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्विकारली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. या सगळ्या मुद्द्यावर सहकार्याची भूमिका असून आता आपल्यात दुही कशासाठी, असा विचार तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत. त्यामुळेच तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मनसे-शिवसेनेत असलेली धुसफूस कायमची संपुष्टात आणून सामोपचाराने काम करण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

याचा फायदा आगामी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, महापालिका निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूरगामी विचार करून भाजप, शिवसेना आणि मनसे नेत्यांनी हा समेटाचा कार्यक्रम आखला असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com