नाशिक : (Nashik) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महिला (Women) आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोशल मीडियावरील चर्चीत उर्फी जावेद (Urfi javed) यांच्याविषयी केलेल्या टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawade) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (NCP leader Prerna Balkawade questions BJP leader Chitra Wagh on Urfi javed issue)
यासंदर्भात सौ. बलवकवडे यांनी अमृता फडणवीस यांची काही चर्चीत छायाचित्रे पोस्ट केली आहे. त्यात भाजपचे समर्थन करणाऱ्या विविध अभिनेत्री तसेच महिलांची विधाने व कपडे याबाबत चित्राताई तुम्ही काय करणार?. त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न त्यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, सौ. वाघ या सध्या भाजपच्या धोरणानुसार कोणावरही तुटून पडतात. काहीही विधाने करतात. हे करताना त्यांना आपण किती रंग बदलतो याचा विसर पडतो, हे बरे नव्हे.
नाशिक दौऱ्यात त्यांनी ऊर्फी जावेद यांच्या वादात चित्रा वाघ यांनी आगदी बरोबर वक्तव्य केले, असा चिमटा घेत, ज्या पद्धतीने नंगानाच सुरु आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना हा नंगानाच दिसत नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता.
‘ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' या शब्दात उर्फी जावेदवर हल्ला करीत चित्रा वाघ भडकल्या होत्या. याबाबत मला असे म्हणायचे आहे, की ताई महाराष्ट्राची संस्कृती राखण्यासाठी आपण यांचे (अमृता फडणवीस यांचा फोटो सोबत जोडला आहे) काय करणार?. आज पुरुषांनी पण निर्वस्त्र फिरु नये असा काही कायदा आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून केला असता तर आनंद झाला असता. स्त्री- पुरुष समानता व स्त्री हक्कासाठी कायम भांडणाऱ्या आपण आज असे महिलाच्या कपड्यांवर टिका करताना आणि आपले राजकारणातले बदललेले रंग पाहून पाहून कीव येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.