मुंबई : राज्यातील (Maharashtra) कलाकार, कलावंतांच्या प्रश्नावरील लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांचा माऩदऩ वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. एहढेच नव्हे तर मानधनाचे अर्ज मंजुर करण्याबाबतच्या अटी शिथिल करून ही प्रक्रीया सुलभ करण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे या विषयावरील चर्चेत अगदी विरोधी पक्षनेचे देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. मंत्री महोदय जवळ जवळ सर्वच प्रश्नांवर सकारात्मक असल्याची भावना व्यक्त करीत श्री. फडणवीस यांनी त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणे टाळले.
सुनिल प्रभु यांच्या या लक्षवेधीला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागातील कलाकार, लोककलावंत व विविध कला, संस्कृतीचे जतन करणाऱ्या कलाकारांना कोरोना काळात मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधान वितरणाची प्रक्रीया तसेच त्यात वाढ करण्याबाबत आज विधानसभेत लक्षवेधी चर्चेला आली होती. मंत्री देशमुख यांनी त्याचे उत्तर पटलावर ठेवले. त्यानंतर विविध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही अतिशय सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले, या कालाकारांसाठी मानधन देण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. तो अतिशय सकारात्मक आहे. त्यात ३८ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. ढोबळपणे चाळीस कोटी खर्च येऊ शकेल. मात्र गरज पडली तर त्यात वाढ करण्याचा देखील विचार शासन करेल.
यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. देशमुख यांना अडचणीत आणणारा प्रश्न करीत, यासंदर्भात राज्यपालांच्या अभिभाषणात मुद्दा क्रमांक २१ मध्ये छप्पन्न हजार कलाकारांना ३५ कोटी वितरीत केल्याचे म्हटले आहे. त्याची कार्यवाही मार्च २२ पर्यंत अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आपण ३८ कोटी सांगत आहात. दुसरीकडे ४० कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे सांगत आहात. हे तीन आकडे महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमधील तीन पक्षांचे तीन आकडे आहेत काय?. सरकार या विषयावर खऱच गंभीर आहे का?. २८००० सन्मानार्थी आहेत. त्यांना आपण २५५० रुपये दरमहा मानधन देतो. राज्यातील कारागृहातील कैद्यांवर शासन ८८ रुपयो रोज खर्च करते. ती रक्कम २६५४ रुपये होते. थोडक्यात अगदी कैद्यांपेक्षाही कमी मानधन दिले जाते. जसे काही मंत्री कैद्येत गेले तसे लोक कैद्येत गेले तर त्यांना जास्त पैसे मिळतील अशी स्थिती आहे, अशी विचारणा केली.
त्यावर श्री. देशमुख यांनी तातडीने तुमच्या सुचनेची दखल घेत त्यात सुधारणा करू. आवश्यकता भासल्यास ही प्रक्रीया सुटसुटीत करू. जे कलाकार, अगदी कोकणातील दशावतार, भारूड, शाक्य, तुरा, महिला कलाकार, जाखडी, प्रवचन अशा सर्वांचा त्यात समावेष करण्याचा प्रयत्न करू. जिल्हा स्तरावर त्याबाबत आमदारांनी त्यात लक्ष घालावे. त्यांनी शिफारस केलेल्या कलाकारांचाही जिल्हाधिकारी स्तरावर विचार करण्याच्या सुचना दिल्या जातील असे स्पष्ट केले.
त्यानंतर विविध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी असे पॉझिटीव्ह उत्तर दिले. वैभव नाईक, वामन साळवी, नाना पटोले, आशिष शेलार यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. त्यात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मंत्री महोदयांनी एव्हढे सुटसुटीत उत्तर दिले आहे, की त्यात काही राहिले नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणणेअमित देशमुखांचे कौतुकच केले.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.