Jayant Patil On Union Budget : महाराष्ट्राला 60 हजार कोटी देणार होते, त्याचे काय झाले?; जयंत पाटलांकडून अर्थसंकल्पाची खिल्ली

Jayant Patil On 60 Thousand Crore Package Promised to Maharashtra : केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सादर केला. यात कितीही घोषणा असल्या तरी, त्या प्रत्यक्षात येतील का? हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्राला 60 हजार कोटी रुपयांची पॅकेज जाहीर करणार होते, त्याची आठवण जयंत पाटील यांनी करून दिली.
Jayant Patil On Union Budget
Jayant Patil On Union BudgetSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil News : भारतीय जनता पक्षाचे केंद्रतील सरकार महाराष्ट्रासाठी 60 हजार कोटींचा निधी देणार होते. या निधीचा त्यांना विसर पडला की काय?, या निधीचे काय झाले? पंतप्रधान मोदी 60 हजार कोटी देणार होते. मात्र राज्याला फक्त 50 कोटी मिळाले आहेत. या शब्दात जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या बजेटची चिरफाड केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर खरमरीत टिका केली. दोन महिन्यात महाराष्ट्रात निवडणुका आहेत. त्यामुळे जनतेला खुश करण्यासाठी त्यात अनेक घोषणा आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे नेते हा अर्थसंकल्प विसरून जाते, असा दावा त्यांनी केला.

Jayant Patil On Union Budget
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : बिहार, आंध्रला विशेष पॅकेज, "महाराष्ट्राला काय? ठेंगा!"; विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

जयंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधी पक्षांच्या सरकारांवर टिका केली होती. त्यावेळी त्यांनी 'रेवडी वाटप', या शब्दात विरोधकांना लक्ष्य केले होते. आजच्या बजेटमध्ये 'रेवडी वाटप'म्हणता येतील , अशा किती घोषणा आहेत. सध्या भाजपचे सरकार काय करीत आहे, अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली.

Jayant Patil On Union Budget
Union Budget 2024 Live : अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या...

गरीब जनतेसाठी घरे बांधण्याची योजना जाहीर केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात 3 कोटी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. मात्र मागच्या घोषणेतील घरांसाठी पैसे आलेले नाहीत. पंतप्रधान निवास योजनेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील घरांसाठी देखील पैसे नाहीत. त्यामुळे अशा योजना अनेक आहेत. त्यांना कुठलाही प्रकारचा निधी नाही. त्यामुळे या घोषणेवर किती विश्वास ठेवावा हे लवकर स्पष्ट होईल.

महाराष्ट्राला काय पाहिजे? अशी चार वाक्य बोलण्याची पंतप्रधान मोदी यांची पद्धत आहे. प्रत्यक्षात कृती काय होते? हे आपल्यासमोर आहे. 'रेवडी वाटप' हे शब्द आमचे नाहीत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात काय असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com