Jalgaon News; महापालिका आयुक्त कोण? पवार की गायकवाड?

जळगाव महापालिकेतील प्रशासकीय पेच आज सुटण्याची चिन्हे
Devidas Pawar & Vidya Gaikwad
Devidas Pawar & Vidya GaikwadSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरवासीयांनी पालिका ते महापालिका यादरम्यान अनेक राजकीय पेच (BJP) अनुभवले आहेत. मात्र, प्रशासकीय तिढा मात्र पहिल्यांदाच अनुभवला येत आहे. आयुक्ताच्या खुर्चीवर बसणार कोण? याचा फैसला आज तरी होणार काय, याकडेच नागरिकांचे लक्ष आहे. (Suspence on Japgaon commissioner will may clear today)

Devidas Pawar & Vidya Gaikwad
Dada Bhuse; भाजप नेत्यांकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर स्तुतीसुमने

जळगाव महापालिकेच्या विद्यमान आयुक्त विद्या गायकवाड आहेत. या पदावर नुकतीच पवार यांची नियुक्ती झाली होती. त्यातून प्रशासकीय वाद निर्माण झाला होता. हा वाद गेले काही दिवस सुरु आहे. त्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय अपेक्षित आहे.

Devidas Pawar & Vidya Gaikwad
Election News; पदविधर निवडणुकीमुळे ४१३ कोटींच्या कामांना ब्रेक

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर परभणी येथील देवीदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. शासनाकडून पत्र प्राप्त होताच श्री. पवार यांनी जळगावात दाखल होऊन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्या वेळी जळगावच्या आयुक्त डॉ. गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या.

आयुक्त डॉ. गायकवाड यांनी आपल्या बदलीलाच थेट ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. निकाल देताना ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देवीदास पवार यांच्याकडे पुढील सुनावणीपर्यंत ठेवला. मात्र, यातही धोरणात्मक फायलींवर स्वाक्षऱ्या न करण्याबाबत निर्देशही दिले. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला खीळ बसली आहे. नियमित आयुक्तपदाची नियुक्ती झाल्यानंतरच प्रशासकीय कामकाज सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज निकालाची शक्यता

महापालिकेच्या आयुक्तपदाबाबत ‘मॅट’मध्ये आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या आहेत. गुरुवारी (ता. ५) निकालाची शक्यता आहे. आयुक्तपदी देवीदास पवार की डॉ. विद्या गायकवाड राहणार, याचा निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आणखी पुढची तारीख पडल्यास महापालिकेच्या अनेक कामांना खीळ बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com