Dr. Shobha Bachhav : खासदार शोभा बच्छाव यांच्यासमोर धर्मसंकट, विधानसभेला कोणाचा प्रचार करणार?

Dr. Shobha Bachhav Malegaon Congress : मालेगाव मध्य मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा वाटपात आघाडी विषयी आणि प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराविषयी गोंधळ आहे.
Dr. Shobha Bachhav
Dr. Shobha BachhavSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News, 23 June : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसवर मतांचा पाऊस पडला. यावेळी सर्वच नेते पक्षभेद विसरून भाजप विरोधात एकत्र आले होते. लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मालेगाव मध्य मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा वाटपात आघाडी विषयी आणि प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराविषयी गोंधळ आहे. लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेस (Congress) आणि 'एमआयएम' यासह अन्य सर्वच पक्षाचे नेते मांडीला मांडी लावून बुथवर बसले होते. त्यांनी काँग्रेससाठी मनापासून काम केले. त्याचा परिणाम मतपेटीतूनही दिसून आला.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला अवघी 4,542 मते मिळाली. काँग्रेस पक्षाच्या डॉ. शोभा बच्छाव यांना येथून 1 लाख 98 हजार 869 मते मिळाली. बच्छाव या 4000 मतांच्या निसटत्या आघाडीने विजयी झाल्या.

लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुक्ती आणि त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख एकत्र आले होते. अन्य सर्व पक्ष देखील त्यांच्यासोबत राहिले लोकसभेत एकत्र राहिलेले हे नेते विधानसभेत मात्र परस्परांविरोधात उतरणार आहेत.

Dr. Shobha Bachhav
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोग 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; नेमकं प्रकरण काय?

अशावेळी काँग्रेसच्या (Congress) खासदार डॉ. बच्छाव कोणाचा प्रचार करणार? हा मोठा उत्सुकतेचा विषय आहे. त्यातून एक नवे राजकीय समीकरणदेखील जन्माला येऊ शकते. त्यामुळे आगामी काळात येथे अनेक पक्षांमध्ये तोडफोड होऊ शकते. त्या दृष्टीने कार्यकर्त्यामध्ये सध्या गोंधळाची स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com