Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब का होत आहे?

Why State Government is delaying in Reservation for Maratha community-काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांनी भारत जोडो यात्रेमुळे जनमत ‘इंडिया’च्या बाजूने झाल्याचा दावा केला.
Vajahat Mirza
Vajahat MirzaSarkarnama

Malegaon Congress news : शासनाने शांतताप्रिय पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर केलेला लाठीमार निषेधार्ह आहे. काँग्रेस पक्षासह आम्ही त्याचा निषेध करतो. मराठा व मुस्लिम बांधवांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांनी केली. (State Government should give Reservation for Maratha as well Muslims)

मालेगाव (Malegaon) येथे (Congress) आमदार वजाहत मिर्झा यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी भाजपचे (BJP) सरकार मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देण्यास विलंब का करते असा प्रश्न केला?

Vajahat Mirza
Thackeray Group Politics : मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटींचा चुराडा : शिवसेनेचा रोख कुणाकडे?

यावेळी आमदार मिर्झा यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करीत, हा पक्ष समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, देशातील जनतेच्या सुख-दु:खाशी सोयरेसुतक नसलेले नेते रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ करतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र जनतेचे सुख- दु:ख व अडीअडचणी समजून घेण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेचार हजार किलोमीटरची पदयात्रा केली.

Vajahat Mirza
Dhule Congress News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका!

राहुल गांधी थेट लोकांना भेटले. त्यांच्या अडचणी, दुःख समजून घेतले. त्यामुळेच लाखो लोक त्या यात्रेत सहभागी झाले. या यात्रेला भरभरून मिळालेला प्रतिसाद म्हणजेच देशातील जनमत इंडिया ‘आघाडी’च्या बाजूने आहे. ‘नफरत की बाजार मे प्रेम’ वाटण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे, असे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, आमदार मिर्झा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात महागाई गगनाला भिडली आहे. बेरोजगारी वाढली आहे. तरुणांसह शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी सर्वांमध्ये शासनाबद्दल रोष व नैराश्‍याची भावना आहे. मोठमोठ्या घोषणा करून थापा मारण्यातच भाजपचे नेते गुंग आहेत. जातीय विद्वेष पसरवून राजकीय पोळी भाजण्याचे काम ते करीत आहेत. अल्पसंख्याक समाज बांधवांवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत.

Vajahat Mirza
Aditya Thackeray on Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांना दहीहंडीला वेळ, जरांगेंना भेटायला नाही

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग, जमील क्रांती, जैनू पठाण, हाफीज इंतिया, गफ्फार शेख, तय्यब खान, अलिम खान, कय्युम खान आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com