विनयभंगाचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण...

उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपिठात चकरा मारत होता. मात्र भंडारा (Bhandara) पोलिसांच्या जामिनावर हरकत घेण्याच्या ॲफिडेव्हीटमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द झाला.
Sumedh Shyamkuvar, Bhandara.
Sumedh Shyamkuvar, Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात अडकलेला राष्ट्रवादी (NCP)तो नेता अखेर भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव पोलिसांना शरण आला. त्याने आज रात्री 8 वाजता तब्बल 23 दिवसानंतर आंधळगाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सुमेध श्यामकुंवर असे त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोपी असलेल्या नेत्याचे नाव आहे.

शरणागती नंतर आंधळगाव पोलिसांनी (Police) त्याला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीमुळे आज उशिरा रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी अटक करण्यात आली. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.विशेष म्हणजे आरोपी महिन्याभरापासून अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपिठात चकरा मारत होता. मात्र भंडारा (Bhandara) पोलिसांच्या जामिनावर हरकत घेण्याच्या ॲफिडेव्हीटमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द झाला आणि आज अखेर सुमेध श्यामकुंवर याने आंधळगाव पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुमेध श्यामकुंवर हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून 10 वर्षांपासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करत आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सावरी ठाना जिल्हा परिषद क्षेत्रासाठी निवडणूक लढविली होती. तेथे त्यांना पराभव पत्करावा लागला.

भंडारा येथील वसतिगृहात राहणाऱ्या १०व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर राष्ट्रवादीचा नेता, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रस्त्याच्या शिवारात आपली चार चाकी गाडी थांबून त्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 25 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती. 26 फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्‍यामकुंवर यांच्यावर पास्को ८ व 354 अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. त्यात त्यांची गाडी क्रमांक MH 36 H 7009 मारुती सुझुकी वॅगन आर ही आंधळगाव पोलिसांनी भंडारा येथून जप्त केली.

आंधळगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत मुलीच्या फिर्यादीवरून ठाणेदार सुरेश मटामी यांनी कलम 354 व पास्को 8 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत होते. तर आरोपी सुमोत श्‍यामकुंवर यांचे भंडारा शहरात राजीव गांधी चौकात यशोधन ग्रामीण शिक्षण संस्था द्वारा संचालित महिला समाज मुलींचे वसतिगृह आहे, येथे ती वास्तव्यास होती. सदर मुलगी श्यामकुंवर यांच्या मालकीच्या वसतिगृहात राहायची.

Sumedh Shyamkuvar, Bhandara.
नितीन गडकरी आले अन् भंडारा जिल्हावासीयांना खूष करून गेले…

त्या वसतिगृहाचे मालक स्वतः त्या मुलीला जांब येथे चारचाकी गाडीने नेण्यासाठी आले. शासनाने नुकतेच वसतिगृहात मुला-मुलींना राहण्याची परवानगी दिली असल्याने सदर संचालकाने बाहेरगावी असलेला मुलींना आणण्यासाठी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच हे त्यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन जवळील डोंगरगाव विहिरगाव रोडवर गाडी थांबून पीडित मुलीची छेडखानी केल्याचा आरोप या मुलीने पोलीस स्टेशन आंधळगावला दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी श्यामकुंवर यांनी आत्मसमर्पण केल्याने आज उशिरा आरोपीला अटक केली असून उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

२०२२ हे वर्ष भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसाठी चांगले ठरले नसल्याचे पुन्हा एकदा या प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारताना पोलिसांना अश्लील शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी भंडारा पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 12 तास तुरुंगाची हवा खावी लागली होती. अखेर अंतरिम जामिनावर त्यांची तात्पुरती सुटका झाली आहे. अजून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मोहाडीच्या आमदाराचे अश्लील शिवीगाळ प्रकरण हे संपूर्ण देशात गाजले असताना, पुन्हा दुसऱ्या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. जयंत वैरागडे व त्यांच्या दोन्ही भावांवर जबलपूर महिला पोलिसांनी कलम 354 A नुसार विनयभंगाचा गुन्हा नोंद दाखल केला आहे. ही सर्व प्रकरणे अजून सुरुच असताना आता पुन्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुमेध श्यामकुंवर यांच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद झाल्याने पुन्हा एकदा भंडारा राष्ट्रवादी पक्षाचे नेते चर्चेत आले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी दोन मोठ्या नेत्यांवर आणि फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मोठ्या नेत्यावर पोलिस कारवाई होणे, ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी निश्‍चितच अडचणीची ठरणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com