BJP News: गोंधळलेला भाजप सत्यजीत तांबेंना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत?

Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात भाजप उद्या निर्णय घेणार
Chandrashekhar Bawankule & Satyajeet Tambe
Chandrashekhar Bawankule & Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात भाजपने (BJP) उमेदवार दिलेला नाही. सध्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये कोण आपल्या विचारांचा आहे, याचा विचार करून कोणत्या अपक्ष उमेदवाराला साथ द्यायची किंवा त्याच्या पाठीमागे उभे राहायचे याचा निर्णय भाजपच्या वतीने बुधवारी घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bavankule) यांनी दिली. (Will bjp give support to Satyajeet Tambe in Nashik Constituency)

Chandrashekhar Bawankule & Satyajeet Tambe
Congress News: नाना पटोले `पदवीधर`साठी काय कानमंत्र देणार?

या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म असतानाही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना पक्षातून बडतर्फ केले. सत्यजीत तांबे यांनी भाजपशी सुत जुळवले असल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत भाजपने त्यांना पाठींबा दिला किंवा तांबे यांनी तो स्विकारल्यास मतदारांमध्ये त्याचा काय संदेश जाईल, त्यांना मदत होईल का?, याची राजकीयदृष्ट्या उत्सुकता आहे.

Chandrashekhar Bawankule & Satyajeet Tambe
Politics : ''...त्यांचं तैलचित्र लावताना कशाचं डोंबलाचं राजकारण करता!''; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरेंना सुनावलं

विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने बावनकुळे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागपूर व अमरावती पदवीधर मतदारसंघात विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने प्रवेश केला असून, मराठवाडा व नाशिक विधान परिषदेच्या दोन जागा महत्त्वाच्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

नाशिकमध्ये भाजपने उमेदवार उभा केला नाही. मात्र आपल्या विचारांचा व भविष्यात आपल्याला कोण साथ देईल, याचा विचार करून बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने उमेदवार उभा केला नसला तरी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे यांना चाल दिली.

तांबे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपची भूमिका नाशिक पदवीधर मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपचे पूर्ण सत्तेचे स्वप्न

गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील पूर्ण सत्ता येणे गरजेचे आहे. भाजपचे दीडशेपेक्षा अधिक आमदार विधानसभेसाठी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विधान परिषदेमध्ये भाजपला बहुमतासाठी दोन मतांची आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्या विचारांचा व आपल्याला साथ देणाऱ्या उमेदवाराला नाशिक, मराठवाडा व कोकण विभागातून निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विधान परिषदेत बहुमत झाल्यास सभापतिपदासह लव- जिहादसारखे विधेयक मंजूर करण्यात अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com