NDCC Bank Issue : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यांमुळे अडचणीत आली आहे. याबाबत आरोप असलेले बहुतांश नेते सध्या अजित पवार यांच्याबोरबर गेले आहेत. आज पवार यांनी जिल्हा बँकेचा उल्लेख करीत शेतकऱ्यांसाठी बँक वाचविण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या वक्तव्यावरून दिलासा कमी आणि गोंधळ जास्त होण्याचीच शक्यता आसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Confusion increased after Ajit Pawar mantion on NDCC bank relief)
नाशिक (Nashik) जिल्हा बँक अडचणीत आहे. त्याबाबत सहकार अधिनियमानुसार संचालक मंडळाचा गैरव्यवहार तसेच त्यांच्याकडून वसुलीचा प्रश्न प्रलंबीत आहे. त्यात बहुतांश नेते पवार यांच्या सभोवताली वावरताना दिसतात. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांची घोषणा संभ्रम निर्माण करणारी ठरू शकते.
जिल्हयातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अडचणीत सापडली असून, या बॅंकेला राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
बँकेला खरा दिलासा राजकीय नेते, आमदार असलेल्या ज्या संचालकांवर कोट्यावधींची वसुलीची प्रक्रीया सुरु आहे. त्याला राज्य सरकारनेच स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवणे, भरपाई वसुली करणे आणि दोषींना कडक शासन केल्यावर मिळेल. मात्र त्याचा साधा उल्लेखही पवार यांनी न केल्याने त्यांचा खरा पाठींबा बँकेला की राजाकीय नेत्यांना संरक्षण देण्याला याची चर्चा आहे.
बॅंकेत यापूर्वी काय झाले याचा विचार न करता जिल्हयाची आर्थिक नाडी असलेल्या नाशिक जिल्हा बॅंकेला पूर्वपदावर आणण्यासाठी महायुती सरकार काम करणार असल्याचे पवार यांनी आश्वासन दिले. त्यामुळे चार वर्षांपासून डबघाईस असलेल्या जिल्हा बॅंकेच्या कारभारावर नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनीच बॅंकेबाबत भूमिका मांडल्याने जिल्हयातील शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पवार म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने शेतकरी व पिके संकटात सापडली आहेत. पाऊस पडावा म्हणून पांडुरंगाला साकडे घालतं आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परंतू असे असले तरी सरकार शेतकयांच्या पाठीशी उभे राहिल. वेळ प्रसंगी केंद्र सरकारची मदत घेवू. देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांना गती देणार आहे. राज्यात मिनी महाराष्ट्र असलेल्या नाशिकच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलतं होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.