विरोधाला विरोध नाही, पण अपप्रवृत्तींना सोडणार नाही

काँग्रेसच्या कल्पना महाले यांची धुळे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती.
Kalpna Mahale at Dhule Corporation
Kalpna Mahale at Dhule CorporationSarkarnama
Published on
Updated on

धुळे : केवळ विरोधाला विरोध ही आमची भूमिका नसून शहर (Dhule) विकासास सर्वतोपरी सहकार्य करू. मात्र चुकीच्या व गैरप्रवृत्तीविषयी विरोधी पक्षनेता (Opposition leader) म्हणून यथोचित जबाबदारी पार पाडू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महापालिकेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेत्या तथा माजी महापौर कल्पना महाले (Kalpna Mahale) यांनी पदग्रहण सोहळ्यावेळी मांडली. (Kalpna Mahale appointed as opposition leader of Dhule corporation)

Kalpna Mahale at Dhule Corporation
काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बुधवारी विरोधी पक्षनेत्याच्या दालनात प्रवेशावेळी फीत कापण्यात आली. नंतर सौ. महाले यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती शीतल नवले, माजी विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांसह विविध नगरसेवक उपस्थित होते.

Kalpna Mahale at Dhule Corporation
दादा भुसे हे विकासकामांत भेदभाव करणारे मंत्री!

यावेळी सौ. महाले म्हणाल्या, की ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे मला कामास बळ मिळणार आहे. शहराला नवीन ओळख देण्यासाठी, नागरिकांना मूलभूत सेवासुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. शहराचा विस्कळित पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्‍न, मोकट जनावरे व कुत्र्यांची समस्या, रस्ते नूतनीकरण या कामांसाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल. यापूर्वी महापालिकेत अनेक जबाबदारीची पदे सांभाळलेली असून, मनपा कार्यप्रणालीतील गैरशिस्त व गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून कार्यक्षमतेने कामकाज करेन.

यावेळी ज्येष्ठ नागरिक व पत्रकार महेश घुगे, निवृत्त अभियंता हिरालाल ओसवाल, पत्रकार योगेंद्र जुनागडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिक उत्तमराव पाटील, वाहिद अली सय्यद, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीप महाले, शरद शिंपी, चौधरी, जसपाल सिसोदिया, जयेश बाफना उपस्थित होते. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com