शिवसेना महापालिकेच्या निवडणुका आयात उमेदवरांवर लढणार का?

भाजप कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Jaykumar Rawal, BJP leader
Jaykumar Rawal, BJP leaderSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगितले जाते. महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी या पक्षाचे स्वतःचे काहीच दिसत नाही. ते काय आता आयात उमेदवारांवर दिवस काढणार आहे काय? असे टिकास्त्र माजी मंत्री, भाजप नेते जयकुमार रावल (BJP leader Jaykumar Rawal) यांनी शिवसेनेवर सोडले आहे.

Jaykumar Rawal, BJP leader
भाजपचे खासदार आमच्यावर टीका करतात, त्यांनी एक मुतारी तरी बांधली का?

भाजप कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankja Munde) उपस्थित होत्या. यावेळी महापालिका निवडणुकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढल्याने वाढीव संख्येत भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी पन्नास टक्के उमेदवारी देण्याची घोषणा भाजपचे नाशिकचे प्रभारी रावल यांनी केली.

Jaykumar Rawal, BJP leader
नुकसान भरपाईत जळगावचे नाव नाही, गुलाबभाऊ झोपा काढता काय?

ते पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याची वाताहात झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून सरकार विरोधातील राग व्यक्त करण्याची संधी आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागून दिवाळी नंतरच्या खऱ्या दिवाळीत फटाके उडविण्यासाठी सज्ज व्हावे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचे शिवसेनेकडून वांरवार सांगितले जाते. शिवसेना आयातांवर दिवस काढणार का, असा सवाल करताना राज्य सरकारने दोन वर्षात महापालिकेला काय दिले याचा हिशोब देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला मेट्रो प्रकल्प दिला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी भरघोस निधी दिला. महाविकास आघाडी सरकारने काय दिले, असा सवाल श्री. रावल यांनी केला.

यावेळी श्रीमती मुंडे यांनी भाजप परिवारवादी पक्ष नसून एक परिवार आहे. या परिवाराने वज्रमुठ करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्याचे आवाहन केले.

त्या म्हणाल्या, भाजपच्या रूपाने देशात सर्वात मोठे संघटन उभे राहीले आहे. संघटनांच्या माध्यमातून देशभरात भाजपने सत्ता स्थापन केली. केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू आहे. सुवर्णकाळ कार्यकर्त्यांच्या संघर्षातून तयार झाला असून, यापुढेही संघर्षासाठी कार्यकर्ता तयार आहे. त्यासाठी मनोबल टिकविणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात भाजप कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली. सेवा हा भाजपचा संस्कार आहे. काँग्रेसने सत्ता काळात गरिबांच्या भावनांशी खेळ केला. गरिबीचे भांडवल पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले.

या वेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, धुळ्याचे महापौर नाना कर्पे, डॉ. प्रशांत पाटील, नामको बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक, महापालिकेचे सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, माजी आमदार बाळासाहेब सानप, हिमगौरी आहेर- आडके, विक्रांत चांदवडकर आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com