BJP M.P. Unmesh Patil
BJP M.P. Unmesh PatilSarkarnama

नुकसान भरपाईत जळगावचे नाव नाही, गुलाबभाऊ झोपा काढता काय?

भारतीय जनता पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोर्चा काढण्यात आला.
Published on

जळगाव : शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या यादीत जळगाव जिल्ह्याचे नावच नाही. पालकमंत्री गुलाबभाऊ (Guardian minister Gulabrao Patil) तुम्ही झोपा काढता की काय? असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील (BJP MP Unmesh Patl) यांनी लगावला आहे.

BJP M.P. Unmesh Patil
शिस्तीच्या भाजपाला बेशिस्तपणाचे ग्रहण; मंचावरील गर्दीने "पंकजाताई" भडकल्या!

भारतीय जनता पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजपचे विविध नेते सहभागी झाले. यावेळी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले. माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी हा मोर्चा काढला होता.

शेतकरी मोर्चात बोलताना ते म्हणाले, गिरीशभाऊ महाजन मंत्रिमंडळात असताना जिल्ह्यात सिंचनासाठी पैसे आणले, परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक पैसाही आणला नाही. एक वेळ या गुलाबभाऊंचा आवाज असायचा ते शिंगाडा मोर्चा काढायचे. त्यावेळी ते खऱ्या अर्थाने वाघ वाटत होते. मात्र आता सरकारमध्ये त्या वाघाची शेळी झाली आहे. या मंत्र्यांना कोणत्याही गावात फिरू देवू नका.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com