Pradeep Kurulkar: कुरुलकरांनी 'ब्राम्होस'सह 'अग्नि' आणि 'रुस्तम' क्षेपणास्त्रांचीही माहिती दिली; 'असा' झाला दोघांचा संवाद

ATS Chargesheet News : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांची गुप्तहेर झारा दासगुप्ता नावाने कुरुलकरांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधायचे
Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हनीट्रॅपमध्ये अडकून भारतीय संरक्षणासंबंधीची महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तहेराला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातूनही 'एटीएस'ने अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. प्रदीप कुरूलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता यांच्यातील संवादातून कुरूलकर यांनी ब्राम्होस क्षेपणास्त्रासह 'अग्नि' आणि 'रुस्तम' या क्षेपणास्त्रांचीही माहिती पुरवल्याचाही आरोप कऱण्यात आला आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांची गुप्तहेर झारा दासगुप्ता नावाने कुरुलकरांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधायचे. त्यासाठी दोघांनीही खोट्या नावाने सोशलमिडियावर बनावट खाते उडल्याचेही उघड झाले आहे. कुरूलकर आणि झारा सोशल मिडियावरून संवाद साधायचे, या संवादाच्या काही प्रतही 'एटीएस'ने जोडल्या आहेत. या संवादाच्या माध्यमातून कुरुलकरांनी झाराशी झालेल्या चर्चेत ब्राह्मोस क्षेपणास्क्षाची माहिती दिल्याचे आधी उघड झाले होते.

Pradeep Kurulkar Case Update
Rahul Gandhi Marriage : राहुल गांधी लग्न कधी करणार ? शेतकरी महिलेच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, " तुम्हीच मुलगी शोधा"

त्यानंततही त्यांनी 'अग्नि' आणि 'रुस्तम' यांसारख्या क्षेपणास्त्रांसंबंधी चर्चा केल्याचे नव्या तपासातून समोर आले आहे. 'एटीएस'च्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात माहिती दिली आहे. कुरुलकर यांनी झारा दासगुप्ताला प्रत्यक्षात भेटून तिला ब्राह्मोससंबंधीचे संवेदनशील माहिती देण्याचीही त्याने तयारी केली होती. इतकेच नव्हे तर, एसडीआरडीओने विकसित केलेल्या प्रकल्पांची संवेदनशील माहितीदेखील पाकिस्तानी गुप्तहेर झाराला दिल्याचा आरोप एटीएस ने आरोपपत्रात केला आहे.

शत्रूराष्ट्राला संवेदनशील गोपनीय माहिती दिल्यास देशाच्या सुरक्षितेतला धोका पोहचू शकतो, त्यामुळे अशी गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरविणे गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव कुरुलकर असतानाही त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानी हेर झाराला क्षेपणास्त्रांची माहिती शत्रूराष्ट्राला गोपनीय पुरविल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कुरूलकरांनी दासगुप्ताला देशाच्या संरक्षण क्षेपणास्त्रांची संवेदनशील माहिती शत्रुराष्ट्राला पुरविली. त्यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते उघड करण्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुरुलकरांना हनीट्रॅमध्ये अडकवणारी झारा दासगुप्ताही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.'एटीएस'ने याबाबतचे पुरावेदेखील आरोपपत्रात जोडले आहेत.

Pradeep Kurulkar Case Update
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : गोऱ्हे, कायंदे, सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते आपल्याला का सोडून जातात ? ; शिंदेंचा ठाकरेंना सवाल

चार्जशीटनुसार, झारा आणि कुरूलकरांमध्ये झालेला संवाद --

झाराने प्रदीपला विचारले होते - ब्रह्मोस देखील तुमचा शोध आहे का? कुरूलकर म्हणाले- होय, सर्वात धोकादायक शोध. माझ्याकडे 186 पानांचा प्राथमिक डिझाइन रिपोर्ट आहे. यात ब्रह्मोसच्या सर्व आवृत्त्यांची माहिती आहे. मी तो रिपोर्ट तुझ्यासाठी तयार ठेवीन, तू इथे आल्यावर तुला दाखवीन.

केवळ ब्रह्मोसच नाही तर कुरुलकर आणि झारा यांनी भारताच्या अग्नि 6 आणि रुस्तम (मानवरहित हवाई वाहन), पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र, मानवरहित लढाऊ हवाई क्षेपणास्त्राचीही आणि डीआरडीओच्या ड्रोन प्रकल्पांवरही दोघांनी चर्चा केली.

एटीएसने या प्रकरणातील गुप्त माहिती असलेली कागदपत्रेही सीलबंद कव्हरमध्ये न्यायालयासमोर सादर केली आहेत. कुरुलकरने 'हॅपी मॉर्निंग' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर झाराला अॅड केल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. कुरुलकर यांनी सारा यांच्याशी संवाद साधताना आणखी दोन शास्त्रज्ञांची नावे सांगितली होती. एटीएसने या दोन्ही शास्त्रज्ञांशी बोलणेही केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com