निवडणुकीसाठी इच्छुकांची धांदल, भाजपच्या गोटात मात्र सामसूम

जयकुमार रावल यांचे नाशिक महापालिकेकडे दुर्लक्ष होत आहे का?
Jaykumar Rawal & Girish Mahajan
Jaykumar Rawal & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीचा बिगुल वाजला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) गोटात मात्र अद्यापही सामसूम आहे. विकासाच्या माध्यमातून भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा छातीठोक दावा केला जात असला तरी फक्त कागदावर दिसणारा विकास लोकांसमोर नेताना तेवढ्याच सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत भाजपमधूनच व्यक्त केले जात आहे. त्यासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजन, (Girish Mahajan) अशी साद घालण्याच्या तयारीत मोठा गट आहे. प्रभारी असलेले आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, ऐन निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये नेतृत्वावरून बेदिली माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jaykumar Rawal & Girish Mahajan
महिलांचा अपमान करायचा आणि माफी मागायची, हे समर्थनीय नाही!

महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सध्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला असून, आता पुढील टप्प्यात महिला आरक्षण व मतदारयाद्या निश्‍चितीचा कार्यक्रम सुरू होईल. हा प्रशासकीय कामकाजाचा भाग असला तरी राजकीय पक्षांनीदेखील जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसते. शिवसेना घराघरांत, रक्तदान शिबिरे, कार्यकर्त्यांचे मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आठ, पंधरा दिवसांनी शहरात येऊन विविध घोषणा करण्याबरोबरच मेळावे घेत आहेत. यातून शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होत आहे.

Jaykumar Rawal & Girish Mahajan
काँग्रेस नेते म्हणतात, शर्म करो, मोदीजी शर्म करो!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातही उत्साहाचे वातावरण आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पंधरा ते वीस जागा अधिक जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून नियोजन सुरू आहे. शिवसेनेचे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी व समीर भुजबळ यांची गेल्या आठवड्यात भुजबळ फार्मवर बैठक झाली, त्यात आघाडी करण्यावर एकमत झाले. मनसेसारखा चारीमुंड्या चीत झालेला पक्ष नव्या दमाने मैदानात उतरत असताना भाजपकडे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गिरीश महाजन यांनी सहा महिने अगोदरच निवडणुकीची तयारी केली होती. यंदा मात्र प्रभारी सूत्रे असलेल्या आमदार रावल सिंदखेड्यातूनच आदेश सोडत असल्याने स्थानिक पातळीवर काय चालू आहे, हे माहीत नाही. पक्षांतर्गत अनेक गट-तट निर्माण झाले आहेत. त्यामुळे पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असल्यास गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्याची मानसिकता नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सेनेत फौज, भाजपमध्ये काय?

शिवसेनेच्या एका नगरसेवकासह नगरसेविकेच्या पतीला तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन थेट पोलिस आयुक्तांना जाब विचारला होता. त्या वेळी शिवसेनेच्या एकीचे दर्शन घडले होते. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनाही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली, परंतु त्यांना एकाही पदाधिकाऱ्याचा फोनदेखील न आल्याने पक्षात एकटे पडत असल्याची भावना निर्माण झाली. अशीच परिस्थिती इतर नगरसेवकांची असल्याने भाजपमधील मोठा गट रावल यांच्याविरोधात उतरल्याचे दिसून येत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com