Nana Patole : जयप्रकाश छाजेड यांच्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले...कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला !

इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना नाशिकमध्ये अखेरचा निरोप
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नाशिक : (Nashik) महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड (Jayprakash Chhajed) हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. (Congress MPCC chief Nana Patole pay homage to Jayprakash Chhajed)

Nana Patole
Eknath Shinde; लवटे, बोरस्तेंना एकनाथ शिंदे यांनी दिले न्यू इयर गिफ्ट!

कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे.

Nana Patole
Congress; ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

श्री. छाजेड यांचे पार्थीव आज शहरातील काँग्रेस कमेटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सायंकाळी नाशिक अमरधाम येथे त्यांच्यांवर अंत्यसंस्कार झाले.

यासंदर्भात श्री. पटोले म्हणाले, नाशिक शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक व कामगार क्षेत्रात जयप्रकाश छाजेड सक्रीय असायचे. पक्ष संघटनेसोबतच कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत व कामगारांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नाशिक शहर व राज्य पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांच्या हितासाठी लढणारा एक आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com