NCP News; राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी योगिता आहेर

नाशिक येथे नूतनअध्यक्षा माजी नगरसेविका आहेर यांना छगन भुजबळ यांनी नियुक्तीपत्र दिले.
Chhagan Bhujbal & Yogita Aher
Chhagan Bhujbal & Yogita AherSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) नाशिक शहर महिला (Womens Wing) अध्यक्षपदी योगिता आहेर (Yogita Aher) तर युवती शहराध्यक्षपदी ऐश्वर्या गायकवाड (Aishwrya Gaikwad) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन अध्यक्षांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. (NCP leader Chhagan Bhujbal given appointment letter to women wing President)

Chhagan Bhujbal & Yogita Aher
Chhagan Bhujbal News; `भाजप`च्या `त्या` तमाशाने मोदींच्या प्रतिमेला तडा गेला!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी अधिक सक्रिय होऊन कामाला लागावे अशा सूचना श्री. भुजबळ यांनी महिला पदाधिकाऱ्यांना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Chhagan Bhujbal & Yogita Aher
Nashik Congress; निस्तेज नेत्यांत आत्मघातकी गटबाजी पुन्हा सुरु!

श्री. भुजबळ म्हणाले, महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम खासदार शरद पवार यांनी केले. नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री. पवार यांचे विचार, ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे. महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे.

निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवून काम करावे असे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या कधीही लागू शकता त्यामुळे आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे.

त्यादृष्टीने नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारिणी लवकरात लवकर तयार करावी. यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथांच्या महिलांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी तयार करण्यात येऊन कामाला लागावे अशा सूचना त्यांनी केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com