नाशिक : ईडी, (ED) सीबीआय या स्वायत्त संस्था असून, त्यांच्याविषयी संशय घेणे योग्य नाही. राज्य सरकार (Mahavikas Aghadi) चांगली कामे केल्याचा दावा करते, मग त्यांना ‘ईडी’ची भीती का वाटते? घाबरता का? ईडीच्या कामकाजात महाआघाडीकडूनच अडथळा, हस्तक्षेप आणला जात आहे, अशी टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केली.
केंद्रीय राज्यमंत्री डॅा. पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध केंद्राकडून ईडी, सीबीआयचा वापर वाढला असल्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले, की केंद्रीय तपास संस्था राज्य सरकारच्या नेत्यांना त्रास देत नाहीत. ते त्यांचे काम करीत आहेत. याउलट महाविकास आघाडीचे सरकार व नेतेच या संस्थांच्या कामकाजत अडथळे आणत आहेत. याबाबत होणारे आरोप चुकीचे आहेत.
आरोग्य, कृषी, शुद्ध जल, मनरेगा, बचतगट, स्मार्टसिटी, स्वच्छता, पाणलोट आदी ४१ योजना केंद्रातर्फे देशभरात राबविल्या जातात. मात्र या योजनांसाठी केंद्राकडून दिला जाणारा निधी तळागाळापर्यंत पोचतच नाही. याबाबत आढावा घेण्यासाठी असलेल्या दीक्षा समितीच्या अध्यक्षा म्हणून डॉ. सौ. पवार यांनी गुरुवारी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमेवत या योजनांचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. पवार यांनी या वेळी हिजाब, प्रदूषण, रेल्वे, माध्यान्ह भोजन, शेतमालासाठीचे इनाम पोर्टल, कुपोषण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्मार्टसिटी, जलशुद्धीकरण, किसान ट्रेन, पंतप्रधान पीकविमा योजना, गौण खनिज, सेंद्रिय शेती, महामार्ग आदींशी संबंधित कामांचा आढावा घेतला.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.