पिंपळगाव बसवंत : लोकांमध्ये रहा. त्यांच्या अडचणींना धाऊन जा. त्यांचे प्रश्न सोडवले की आपल्या अडचणी, प्रश्न आपोआप सुटतात. समाजासाठी काम करण्याचे ध्येय घेऊन वाटचाल करा, असे आवाहन आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी केले.
आमदार लंके यांचे दिवाळीच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमासाठी येथे आगमन झाले. यावेळी अक्षरश: ते आले, त्यांनी पाहिले...अन जिंकून गेले, या ओळीचा प्रत्यय पिंपळगाव बसवंत शहरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला आला. कोविड काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवून देवदूत ठरलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके हे आज येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते. त्यांचे जल्लोषात, फटाक्याची आतषबाजी यासह अगदी मंत्र्याचेही स्वागत फिके पडावे अशा पद्धतीने तरूणांनी त्यांचे स्वागत केले. तरूणाईमध्ये आमदार लंके यांची क्रेझ पाहता दोन तासांच्या दौऱ्यात त्यांनी अनेकांची मने जिंकली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड सेंटरमधून हजारोंना जीवनदान देत आमदार लंके यांचे सामाजिक कार्य सर्वदूर पोहचले. आमदार लंके आज अनौपचारिकपणे उद्घाटनाला आले. आमदार दिलीप बनकर यांनी स्व. बनकर पतसंस्था, पिंपळगांव बाजार समिती तर पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी संपर्क कार्यालयात त्यांचे स्वागत केले. मालक रेडीमेडमध्ये साहिल लोखंडे, साधना मिसळ येथे ॲड. गितेश बनकर यांनी स्वागत केले. आमदार लंके यांची साधी राहणी, ग्रामीण ढंगातील वतृत्व यामुळे उपस्थितांना ते अधिकच भावले. आमदार बनकर यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. गावरान ढंगातील त्यांच्या शाब्दीक फटकेबाजीला उपस्थित तरूणांनी जोरदार टाळ्या, शिट्ट्यांनी दाद दिली.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.