यंदाची दिवाळी सायकलवर...पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार!

युवासेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रात वीस ठिकाणी बैलगाडी तसेत सायकल मोर्चा काढत इंधन दरवाढीचा निषेध केला.
Shivsena Given memorandum against Fuel price Hike.
Shivsena Given memorandum against Fuel price Hike.Sarkarnama

येवला : ‘पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार, हेच का अच्छे दिन,’ असा सवाल करत केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड इंधन दरवाढीविरोधात येवल्यातील युवासेनेतर्फे रविवारी बैलगाडी मोर्चा काढत मनमाड-नगर व नाशिक-औरंगाबाद महामार्ग काही काळ रोखला. उत्तर महाराष्ट्रात वीस ठिकाणी आंदोलन झाल्याने शिवसेनेची यंदाची दिवाळी सायकलवर झाली.

Shivsena Given memorandum against Fuel price Hike.
येवल्याच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड; शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ४१ कोटींची मदत!

दिवसेंदिवस केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ करीत असल्याने सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. याच्या निषेधार्थ येवला, नादंगाव, मालेगाव, देवळा, नाशिक यांसह उत्तर महाराष्ट्रात वीस ठिकाणी आंदोलन झाले. जनतेचा संताप व्यक्त व्हावा व शासनाला या दरवाढीची तीव्रता कळावी, यासाठी युवासेनेतर्फे आमदार नरेंद्र दराडे व माजी सभापती संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

Shivsena Given memorandum against Fuel price Hike.
राष्ट्रवादीच्या मंत्र्याशी जमेना : शिवसेना आमदाराचा आत्मदहनाचा इशारा

रविवारी सकाळी विंचूर चौफुली येथे बैलगाडीची रॅली काढून युवासेना व शिवसेनेने आंदोलन केले. आमदार दराडे, पवार यांच्यासह युवकांनी बैलगाडीत बसून इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. या वेळी ‘हेच का अच्छे दिन’, ‘पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार’ अशा घोषणा देत तसेच फलक हातात धरून लक्ष वेधण्यात आले.

पेट्रोल-डिझेलच्या होणाऱ्या प्रचंड दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनता होरपळून निघत असताना, अन्यायकारक दरवाढ कमी करण्याऐवजी रोज दरात वाढ होत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे यामुळे मुश्कील झाले असून, केंद्र सरकारने आतातरी झोपेतून बाहेर यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रोजची दरवाढ अन्यायकारक असून, जुलमी आहे. सामान्य जनतेला ‘जगावं की मरावं’ हा प्रश्न पडला आहे, ही जुलमी दरवाढ त्वरित थांबून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

येवला येथील आंदोलनात तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. बापूसाहेब गायकवाड, युवासेना तालुकाप्रमुख अरुण शेलार, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, सभापती प्रवीण गायकवाड, सारी अन्सारी, शेखर शिंदे, दिनेश पागिरे, विकास गायकवाड आदी सहभागी झाले. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव येथे वीसहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com