येवल्याच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड; शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ४१ कोटींची मदत!

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीत दिला दिलासा मदत निधी उपलब्ध केला आहे.
Chhagan Bhujbal speaks in Yeola meeting
Chhagan Bhujbal speaks in Yeola meetingSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर मदत प्राप्त झाली आहे. येवला मिळणार तालुक्यासाठी ४१.४३ कोटी रुपयांची मदत मिळाली. प्रशासनाने दिवाळीच्या आत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Chhagan Bhujbal speaks in Yeola meeting
आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी मूळ मालकांना वर्ग कराव्यात

श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अदरसुल उपबजाराच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनामुळे गेले दोन वर्षे कामांना अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्यापासून कामांना पुन्हा एकदा गतीने सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना अद्याप संपलेला नाही त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घेवून सहकार्य करावे. कोरोनाच्या काळात अन्न, धान्याची कमतरता आपण पडू दिली नाही, यासाठी माथाडी कामगारांनी महत्वाची भूमिका बजावली.

Chhagan Bhujbal speaks in Yeola meeting
सरकारी जमिनीवर सुरु होती गांजाची शेती; साडेचार कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

ते पुढे म्हणाले, बाजार समितीत जमा होणारा महसूल हा विकासासाठी व शेतकरी हितासाठी खर्च करण्यात यावा. उत्तम पद्धतीने महसूल गोळा करावा आणि उदार मनाने शेतकऱ्यांसाठी खर्च करावा. सर्वांना अतिशय जागरूक राहून काम करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीची मोठी रक्कम केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. राज्याच्या हिश्श्याची येणे असलेली रक्कम राज्य शासनास केंद्र सरकारकडून मिळेल तेव्हा मिळेल परंतु त्यातूनही मार्ग काढत विकास कामे केली जात आहेत. भविष्यातही शासन विकासाची कामे करत राहील.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी सोपान कासार, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, बाजार समितीचे प्रशासकीय सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात अंदरसुल बाजार समितीचे मकरंद सोनवणे, संचालक किसनराव धनगे, किसनराव धनगे, प्रमोद पाटील, साहेबराव आहेर, मधुकर साळवे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, प्रेमलता अट्टल, सुवर्णा सोनवणे, राजेंद्र शेलार, बाळासाहेब आवारे, जयाजी शिंदे, गणपत भवर, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, भानुदास जाधव, ज्ञानेश्वर शेवाळे, रतन बोरणारे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, दीपक लोणारी, सहायक निबंधक पाटील पाडवी, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com