Onion Export Ban: ट्रम्प इफेक्ट; सुप्रिया सुळेंचा ‘तो’ इशारा ठरला खरा; आता कांदा उत्पादक उडवणार सरकारची झोप!

Impact of government policies on onion producers in India: अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि केंद्र शासनाच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात, सत्ताधाऱ्यांना फोन करण्याचे आंदोलन.
Future of onion farming in Maharashtra after export ban
Future of onion farming in Maharashtra after export banSarkarnama
Published on
Updated on

Trump Effect on Indian Farmers: कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत येत असतो. त्याला कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकट कारणीभूत असते. सध्या मात्र डोनाल्ड ट्रम्प टेरीफ इफेक्ट ने अगदी गावकुसातला कांदा उत्पादक देखील रडतो आहे.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवले. परिणामी कांदा मागणी घटली. भाव गडगडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. त्याचे तीव्र पडसाद आशिया खेडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या नाशिकवर झाले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दिंडोरीला कार्यक्रम झाला. खासदार सुळे यांनी डोनाल्ड ट्रम्प टेरीफचा इफेक्ट पिंपळगाव बसवंत आणि दिंडोरी अर्थात नाशिक ते राज्यातील गावोगावच्या शेतकऱ्यांवर होणार आहे. सरकारने याबाबत सावध व्हावे असा इशारा दिला होता. तो इशारा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते आहे.

Future of onion farming in Maharashtra after export ban
Vijaykumar Gavit: भाजपच्या माजी मंत्र्यांची शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड; कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना दिली नाही....

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ इफेक्टचा परिणाम थेट गावातल्या शेतकऱ्यांवर झाला आहे. त्याला भाजप सरकारने बाजारात बफर स्टॉक विकून मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावर नाशिक आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र शासनाच्या संस्थांनी दोन महिन्यांपूर्वी कांदा खरेदी केला. हा कांदा त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येत असतानाच विक्रीला काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला दहा ते अकरा रुपये एवढा निच्चा॑की भाव मिळत आहे. त्याचा निषेध महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे भरत दिघोळे आणि रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार यांनी केला आहे.

याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आज पासून नाशिकचे शेतकरी सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांना दूरध्वनी करून कांदा उत्पादकांच्या समस्या मांडणार आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाब विचारून राजकीय नेत्यांना हैराण करून सोडण्याचे आवाहन नेत्यांनी केले आहे.

दुसरीकडे रयत क्रांती संघटनेच्या नेत्यांनीही अत्यंत आक्रमक होत सरकारी कांद्याचे ट्रक जाळण्याचा इशारा दिला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर कांदा उत्पादकांच्या संतापाला वाट मिळणार आहे. या आक्रमक आंदोलनाने प्रशासनाच्या चिंता देखील वाढल्या आहेत. गेले दोन महिने शेतकऱ्यांत या प्रश्नावर खदखद होती.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत होता. डोनाल्ड ट्रम्प टेरीफचा परिणाम देखील होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. तो आता प्रत्यक्षात येताना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com