तक्रारी होऊनही स्मार्ट सिटीला 2023 पर्यंत मुदत वाढ

शिवसेनेने याबाबत कामांची पाहणी करीत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र हे सगळे दबावाचे राजकारण ठरले आहे.
Smart city Nashik
Smart city NashikSarkarnama

नाशिक : शहरातील स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामांबाबत सातत्याने तक्रारी (Complaints) होत आहेत. शिवसेनेने (Shivsena) याबाबत कामांची पाहणी करीत मोर्चा (Agitation) काढण्याचा इशारा (Warning) दिला होता. मात्र हे सगळे दबावाचे राजकारण ठरले आहे. नाशिक मुन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीची मुदत संपुष्टात आली होती. (Duration Ends) आज झालेल्या बैठकीत केंद्र शासनाने 2023 पर्यंत मुदतवाढ (Extension) देण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या मासिक बैठकीमध्ये अध्यक्ष सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी माहिती दिली.

Smart city Nashik
छगन भुजबळांशी संघर्ष ही सुहास कांदेंची राजकीय अपरिहार्यता!

केंद्रात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने मेट्रो तसेच शहरान वरील वाढत्या नागरीकरणाचा व पायाभूत सुविधांचा ताण लक्षात घेता स्मार्ट सिटी संकल्पना राबवली. या संकल्पने अंतर्गत जवळपास नवीन शहरे वसविली जात आहे. स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करताना पाच वर्षांची मुदत देण्यात आली होती. नाशिक मुन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला 2016 मध्ये दुसऱ्या टप्प्यात मान्यता दिली होती. स्मार्ट सिटी कंपनीचा कार्यकाळ देखील पाच वर्षासाठी म्हणजे सप्टेंबर 2021 अखेर पर्यंत होता.

Smart city Nashik
अबब...धर्मांतरासाठी नाशिकच्या युवकाच्या खात्यात २० कोटी!

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी साठी एकूण 52 प्रकल्प प्रस्तावित होते त्यातील काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले मात्र बहुतांशी प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. पाच वर्षात प्रकल्प पूर्ण झाल्याने पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयजीच्या जीवावर बायजी उदार

स्मार्ट सिटी कंपनी मार्फत विविध प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणले जाणार आहेत. मात्र त्यातील बहुतांशी प्रकल्प मनसेच्या सत्ताकाळात झाली आहेत. तेच प्रकल्प स्मार्ट सिटी कंपनीने पूर्ण झाल्याचे दर्शविले. महाकवी कालिदास कला मंदिरचे नूतनीकरण तसेच महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण ही दोन कामे पूर्णत्वास आली असली, तरी ती कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी आहेत. स्मार्ट पायलट रस्ता तयार करण्यात आला. मात्र तो रस्ता देखील दर्जाहीन असल्याने रस्त्यावरून जाताना रोलर्कॉस्टरचा अनुभव येत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. गावठाणात सध्या सुरू असलेले कामे वादात सापडले आहेत. सीसीटीव्ही बसवण्याचे काम देखील अपूर्ण आहे. गोदावरी सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले, मात्र पहिल्याच पुरामध्ये ती कामे वाहून गेली. ग्रीन फिल्ड विकासा अंतर्गत नवीन नगर वसविण्याचा कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला. होळकर पुलाखाली मेकॅनिकल रेट बसवण्याचे काम देखील अपूर्ण आहे. गेल्या पाच वर्षात स्मार्ट सिटी कंपनी कडून कुठल्याही असे ठोस काम न झाल्याने एकूणच स्मार्ट सिटी कंपनीच्या अस्तित्व बद्दलच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com