Lok Sabha Election News : 'एबी' फॉर्म म्हणजे काय रे भाऊ !

Political News : आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा 'एबी' फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, आता हा राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला एबी फॉर्म म्हणजे काय? हे जाणून घेऊ यात.
Ab Form
Ab Form Sarkarnama
Published on
Updated on

Election News : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राज्यातील काही जागांवर निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचा 'एबी' फॉर्म आवश्यक असतो. पण, एबी फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी कसा? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा 'एबी' फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, आता हा राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला 'एबी' फॉर्म म्हणजे काय? हे जाणून घेऊ यात.

कोणतीही निवडणूक लागली की 'एबी' फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने 'एबी' फॉर्म पळवला, फाडला येथेपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. तसंच, 'एबी' फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे. (Lok Sabha Election News)

Ab Form
Raju Shetti : महाविकास आघाडीला गळ पण प्रतिसाद नाहीच! आता इरादा पक्का, राजू शेट्टी म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election News) आता उमेदवारी अर्ज भरताना पक्षाने दिलेला 'एबी' फॉर्म भरणे आवश्यक असतो. त्यामुळे, 'एबी' फॉर्म म्हणजे नेमके असते तरी काय? याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. निवडणूक प्रक्रियेत 'एबी' फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हंही दिले जाते.

निवडणूक प्रक्रियेत याच 'एबी' फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षाची आमदारकी व खासदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे 'एबी' फॉर्म एकाद्या उमेदवारांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. हे समजण्यासाठी 'एबी' फॉर्म महत्वाचा आहे.

काय आहे 'ए' फॉर्म?

निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे. ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.

संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो.

काय आहे 'बी' फॉर्म?

'बी' फॉर्म हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे. 'बी' फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी (Election ) हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी' फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी' फॉर्म द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.

राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असते. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे निवडणुकीत 'एबी' फॉर्म (Ab Form) महत्वाचा मानला जातो.

Ab Form
Pune Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी बनवली गुन्हेगारांची 'कुंडली'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com