VBA : विधानसभेसाठी वंचित 'ॲक्शन मोड'वर; उमेदवारी निश्चित करण्यास सुरुवात

VBA Maharashtra assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
Prakash Ambedkar and VBA
Prakash Ambedkar and VBASarkarnama
Published on
Updated on

VBA News : लोकसभेला धक्का बसलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. वंचितच्या लोणावळा येथे झालेल्या बैठकीत ताकद असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच आता विधानसभेच्या उमेदवारांचे अर्ज देखील स्वीकारण्यास वंचितने सुरुवात केली आहे. 26 जुलै पर्यंत इच्छुक उमेदवारांना पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे.

वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्यांचे मत जाणून घेईल.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी MVA आणि महायुतीसोबत जाणार हे निश्चित झाले नाही. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा स्वबळावरच लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीकडून केली जात आहे. त्यामुळेच इच्छुक उमेदवारांना 26 जुलैच्या आधी पक्षाकडे अर्ज करायचा आहे.

मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट

मराठा ओबीसीच्या वादात वंचितने ठराव करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठ्यांना ओबीसीतून obc reservation आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच सगेसोयरेचा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच गेल्या वर्षभरात गरीब मराठ्यांना दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी वंचितने केली आहे.

लवकर उमेदवार घोषित करणार

लोककभा निवडणुकीत वंचितच्या काही उमेदवारांचे तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी अर्ज बाद झाले किंवा त्यांनी अर्ज मागे घेतले. यावेळी कुठलीही अडचण ऐनवेळी निर्माण होऊ नये यासाठी पक्षाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्याच दृष्टिने उमेदवार लवकरात लवकर निश्चित करून तांत्रिक अडचणी दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेच्या 38 जागा लढल्या

वंचितने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 38 जागांवर निवडणूक लढली होती. मात्र,2019 ला सात टक्के मतं असणाऱ्या वंचित यंदा साडेतीन टक्यांच्या आसपास मतं मिळाली तसेच एक दोन जागा वगळता सर्वच ठिकाणी वंचितच्या उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. लोकसभा निवडणुकीत 38 जागा लढविल्या होत्या आणि 15 लाखांहून अधिक मते मिळवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com