VBA News : 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी बिल्डरचे ऑफीस फोडलं; अटकेनंतर पोलिसांना न्यायालयाने सुनावलं

VBA Police Builder Court : वंचितच्या महिला मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई यांनी दलित युवकाला शिवीगाळ करणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.
Police arrested VBA workers after vandalism at a builder’s office, but the court later reprimanded the police over their handling of the case.
Police arrested VBA workers after vandalism at a builder’s office, but the court later reprimanded the police over their handling of the case.sarkarnama
Published on
Updated on

VBA News : एका दलित तरुणाला मुंबईतील बिल्डरने कार्यलयात सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना या विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बिल्डर सुशील रहेजा याच्या कार्यालयता घुसून तोडफोड केली. वंचितचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर वंचितचे कार्यकर्त्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. ज्या बिल्डरने शिवीगाळ करत मारहाण केली त्याला अटक न करता कार्यकर्त्यांना अटक केल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

शनिवारी रात्री रात्री पोलिसांनी वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि इतरांना बिल्डर रहेजाचे ऑफिस तोडफोड प्रकरणी अटक केली होती. मात्र न्यालायाने या कार्यकर्त्यांच्या सुटकेचे आदेश देत पोलिसांना फटकारले आहे.

न्यायालयाचे पोेलिसांना खडे बोल

ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे निरीक्षण आहे की, एखाद्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यात आरोपींना नोटीस देणे बंधनकारक असते. त्या गुन्ह्यात जर आरोपी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत असेल तर त्याला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे कायदा सांगतो. मुंबई पोलिसांनी कुठलीही नोटीस न देता थेट अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com