
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबरीवरून राज्यात वाद पेटला आहे. विश्व हिंदू परिषदेने आज अहिल्यानगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. 'औरंगजेब जेवढा क्रूर होता, तेवढंच क्रूरपणे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार वागत आहे', असे विधान करून हर्षवर्धन सपकाळ यांनी आगीत आणखी तेल ओतले.
विश्व हिंदू परिषदेने अहिल्यानगर आणि पुणे इथं पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगर इथं असलेल्या औरंगजेबाची कबर काढण्यावर आक्रमक भूमिका मांडली. राज्य सरकारचे (Government) याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. 17) राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती दिली.
सरकारने यावर निर्णय न घेतल्यास लाखो हिंदू (Hindu) छत्रपती संभाजीनगर इथं जात 'कार सेवा', करतील, असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला. औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार विसरता येणार नाही. त्याचे कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको, अशी कुलकर्णी यांनी भावना मांडली.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या या भूमिकेवर राज्यात पडसाद उमटले. राजकीय, सामाजिक संघटनांकडून यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर टीका करताना, औरंगजेब जेवढा क्रूर होता, तेवढंच क्रूरतेने महाराष्ट्रातले फडणवीस सरकार वागत आहे, संतोष देशमुख यांची हत्या, पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरण, केंद्रात मंत्री असलेल्या खासदारांच्या लेकीबाळी देखील सुरक्षित नाही, अशी कडवट टीका करत आगीत तेल ओतले.
औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे, छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये. घाशीराम कोतवालाप्रमाणे गृहविभाग चालतोय का? असा प्रश्न पडतो. औरंगजेबाची कबर म्हणजे वीरत्वाची कबर नाही, तर ती कबर क्रूरपणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.