Video Prakash Ambedkar : कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, विधानसभेनंतर OBC आरक्षणाला 100 टक्के धोका; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

Prakash Ambedkar On OBC Reservation : 'कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे.' असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News, 04 August : 'कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे.' असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करु नये, अशी मागणी ओबीसी नेते करत आहेत. ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद सुरु असतानाच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. याच यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचं मोठं विधान केलं आहे. तसंच कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यवतमाळमधील आपल्या भाषणात बोलताना आंबेडकर म्हणाले, "कुणबी मराठा (Maratha) हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. तर फक्त 11 ओबीसी आमदार आहेत. कुणबी स्वत:ला ओबीसी म्हणत असले तरी ते सभागृहात मराठ्यांसोबत आहे म्हणतो. मात्र, तो धनगर, माळी वंजारी लिंगायतांबरोबर नसतो. म्हणून त्यांच्यापासून सावध रहा. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका आहे का तर 100 टक्के धोका आहे."

Prakash Ambedkar
Manoj Jarange Patil : "फुकट धमक्या देऊ नये, अन्यथा कोकणात सुद्धा फिरून देणार नाही," जरांगे-पाटलांचा नारायण राणेंना इशारा

तसंच, आरक्षणाला विधानसभा निवडणुकीच्या आधी नाही पण नंतर नक्की धोका आहे. शिवाय जातगणना झाली पाहिजे. मात्र, आता ती कशी वापरली जाते ते पाहणं गरजेचं आहे. दोन-तीन महिन्यानंतर नवीन विधानसभा गठीत होईल. नव्या विधानसभेत ओबीसी जातगणना केली पाहिजे ती मागणी ताबडतोब मान्य केली जाईल.

Prakash Ambedkar
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray : त्यांची जागा पागलखाण्यात; ठाकरे, राऊतांवर बावनकुळेंचा कठोर प्रहार

ओबीसींना वाटेल आपली मागणी मान्य झाली. पण त्यानंतर असा ठराव मान्य होईल की, प्रत्यक्ष किती टक्के ओबीसी आहेत, त्यांची आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती देण्यात यावी, असा ठराव मंजूर केला जाईल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com